नवी दिल्ली: युद्धजन्य येमेनमध्ये फसलेल्या भारतीयांपैकी आतापर्यंत ४ हजार भारतीयांची सुखरूप सुटका करण्यात आलीय. सरकारतर्फे हवाईदलाकडून सुरू असलेलं बचाव अभियान आज संपवण्याचा निर्णय केलाय. मंगळवारी सनाहून ६०० आणि एकूण ७०० भारतीयांना येमेनमधून काढलं गेलं.
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ६०० नागरिकांना आज सनाहून एअर इंडियाच्या विमानांनी आणि १०० नागरिकांना हुदेदाहहून समुद्र मार्गानं आयएनएस तुर्किश पोतनं भारतात आणलं गेलं. विदेश मंत्रालयाचे प्रवक्त्यांनी सांगितलं, आम्ही सनाहून भारतीयांच्या सुटकेसाठी चालवलेलं अभियान उद्या समाप्त करतोय. ज्यांना परतायचं आहे त्यांनी बुधवारपर्यंतच यावं.
येमेनमध्ये उर्वरित असलेल्या भारतीयांबद्दल विचारलं असता, सूत्रांनी सांगितलं की, येमेनच्या भारतीय मिशनमध्ये ४१०० भारतीयांचं रजिस्ट्रेशन केलं गेलं होतं आणि त्यातील अधिकाधिक भारतीयांची सुटका करण्यात आलीय. सरकार अजून काही दिवस समुद्र मार्गानं बचाव कार्य सुरू ठेवणार आहे.
Sending back more than 1100 back through 5 aircraft. Not many left in Sana'a now. pic.twitter.com/l9hZb4AF8x
— Vijay Kumar Singh (@Gen_VKSingh) April 7, 2015
या दरम्यान पाकिस्तान नौसेनेनं ज्या ११ भारतीय नागरिकांची येमेनच्या मुकल्लाहून सुरक्षित सुटका केली ते कराचीमध्ये पोहोचलेत आणि आज ते भारतात पोहोचण्याची आशा आहे. जिबूतीहून भारतीयांना सुरक्षित काढण्याच्या अभियानाची पाहणी करण्यासाठी विदेश राज्यमंत्री व्ही. के. सिंह सनात पोहोचले आहेत.
Was at Sana'a again today to assess ground situation. Along with our own we evacuated 90 plus foreign nationals. pic.twitter.com/6VbN17HhyM
— Vijay Kumar Singh (@Gen_VKSingh) April 7, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.