या कारणांमुळे मूत्रपिंडाचे आजार होण्याचा धोका वाढतो
शरीरातील अशुद्ध घटक बाहेर टाकण्याचे महत्त्वाचे कार्य मूत्रपिंड म्हणजेच किडनी करते. त्यामुळे निरोगी जीवनासाठी मूत्रपिंडाचे कार्य योग्य पद्धतीने होणे गरजेचे असते. परंतु, योग्य काळजी घेतली नाही तर मूत्रपिंडाचे विकार जडतात. त्यासाठी योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते.
Nov 21, 2016, 02:44 PM ISTथंडीत आरोग्यवर्धक कोणती फळे खावीत?
आपला आहार ऋतूनुसार असावा. सध्या थंडीचा मोसम आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याला अत्यंत पोषक अशी फळे खावीत. प्रत्येक फळाचे गुणधर्म वैशिष्ट्यपूर्ण असते. ही फळे आरोग्यवर्धक आहेत.
Nov 19, 2016, 07:28 PM ISTलठ्ठपणा कमी करा केवळ 7 दिवसांत (पाहा व्हिडिओ)
लठ्ठपणातून तुम्हाला मुक्ती मिळवायची असेल तर खालील व्हिडिओ पाहा. जबरदस्त इच्छाशक्ती आणि निरंतर प्रयत्न केले तर तुम्ही लठ्ठपणातून मुक्त व्हाल. तसेच पोटाची चरबी कमी करु शकाल. एका आठवड्यात तुम्ही स्लिम होऊ शकता आणि आपल्या शरिराला चांगला आकार देऊ शकता.
Nov 17, 2016, 09:23 PM ISTसाध्या मीठाऐवजी करा सैंधव मीठाचा वापर
जेवणात मिठाचा वापर अधिक करणे शरीरासाठी नुकसानदायक असते. अनेक आजारांचे कारण ठरु शकते. मात्र आयुर्वेदात सैंधव मीठाचे अनेक फायदे सांगितलेत. सैंधव मीठातील मिनरल्स शरीरासाठी फायदेशीर असतात.
Nov 8, 2016, 11:48 AM ISTप्रदुषणामुळे राजधानी दिल्लीत 1800 शाळा बंद
राजधानीत गेल्या काही दिवसांत पसरलेल्या विषारी वायुमुळे आज सुमारे 1800 शाळा बंद ठेवण्यात आल्या आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
Nov 5, 2016, 11:20 AM ISTनारळाचे दूध त्वचा आणि केसाचे सौंदर्य अधिक प्रभावी खुलवते
नारळाच्या दुधात मोठी ताकद आहे. नारळ दुधामुळे त्वचा अधिक सुंदर होण्यास मदत होते. त्वचा उजळण्यासाठी नारळ दूध खूप मदत करते. तसेच केसाचे सौंदर्य अबाधित राहते. केस गळतीची समस्याही दूर होते. त्यामुळे तुम्ही नारळ दुधाला प्राधान्य दिले तर तुमच्या सौंदर्यात अधिक भर पडेल.
Nov 5, 2016, 09:44 AM ISTथंडीत भरपूर खा हिरवी कोथिंबीर
भाजी, आमटी, कोशिंबीर, चटणी यात हिरवी कोथिंबीर घातल्याने त्या पदार्थाचा स्वाद वाढतो. कोथिंबीरीमुळे केवळ पदार्थाला स्वादच येत नाही तर त्यातील औषधी गुणधर्माचाही शरीराला फायदा होतो. कोथिंबीरीत प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेट, मिनरलसारखी पोषक तत्वे असतात. तसेच कॅल्शियम, फॉस्फरस, आर्यन, कॅरोटीन, पोटॅशियम आणि व्हिटामिन्सही असतात.
Nov 4, 2016, 12:26 PM ISTसीताफळ खाण्याचे अनेक फायदे
सीताफळ हे खाण्यासाठी जितके चविष्ट आहे तितकेच त्याचे आरोग्यासाठी फायदेही आहेत. सीताफळ हे पित्तशामक, तृषाशामक, पौष्टिक, रक्तवर्धक, बलवर्धक, वातदोष कमी करणारे तसेच हृद्यासाठी फायदेशीर असे आहे.
Nov 4, 2016, 10:46 AM ISTसर्दी, ताप,खोकल्यावर रामबाण उपाय तुळस
बदलत्या वातावरणामुळे अनेकांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास होतो. त्यावर घरगुती उपाय करुन तुम्ही सूटका मिळवू शकता. रोग प्रतिरोधक क्षमता कमी झाल्याने सर्दी, ताप याचा त्रास होतो. यावर रामबाण उपाय म्हणजे तुळस.
Oct 31, 2016, 08:36 PM ISTरोज सकाळी खा एक मूठ भिजवलेले चणे
उसळी, भाज्यासाठी वापरलेले चणे आरोग्यासाठी पौष्टिक आहेत. भिजवलेले चणे खाल्ल्यास यातून प्रोटीन, फायबर, खनिजे आणि व्हिटामिन मोठ्या प्रमाणात मिळतात. रोज सकाळी एक मूठ भिजवलेले चणे खाल्ल्यास शरीरासाठी मोठे फायदेशीर आहे
Oct 27, 2016, 11:36 AM ISTसकाळी उठल्यावर थकवा जाणवत असेल तर हे उपाय करा
चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप मिळणे आवश्यक असते. आपल्या शरीरासाठी दररोज 7-8 तास झोप गरजेची आहे. जर झोप झाली नसेल तर संपूर्ण दिवस आऴसवाणा जातो. अपूर्ण झोप अनेक आजारांना निमंत्रण देते. सकाळी उठल्यानंतरही तुम्हाला थकवा जाणवत असेल तर याचे कारण तुमचे बिझी शेड्यूल असू शकते. कामाच्या ताणावामुळे तुम्ही पुरेशी झोप घेऊ शकत नाहीत. याचा परिणाम शरीरावर होतो. सकाळी उठून थकवा जाणवत असेल तर खालील उपाय करा
Oct 24, 2016, 10:04 AM ISTतुळशीची पाने टाकलेल्या दुधाने सेवन आरोग्यासाठी फायदेशीर
हल्ली आपल्याला लहानशी शिंक जरी आली तरी लगेच औषध, गोळी घेतली जाते. याने लगेच आराम पडतो मात्र त्याचे साईडइफेक्टही होतात. मात्र अशा लहान आजारांसाठी औषधे न घेता घरच्या घरीही उपाय करु शकतो. पूर्वीच्या काळी आयुर्वेदाला अधिक महत्त्व दिले जायचे.
Oct 22, 2016, 12:10 PM ISTबॉडी बनवण्यासाठी असा असावा डाएट प्लान
ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी डाएट प्लान बनवणे सोपे असते. मात्र ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांच्यासाठी डाएट प्लान बनवणे कठीण असते. हेल्दी पद्धतीने वजन वाढवायचे असल्यास योग्य प्रमाणात प्रोटीन, व्हिटामिन तसेच फायबर, मिनरल्स यांचे सेवन गरजेचे असते. त्यासाठी खालील डाएट प्लान फिक्स करा आणि बॉडी बनवा.
Oct 20, 2016, 03:10 PM ISTशिंगाड्याचे 7 गुणकारी फायदे
थंडी सुरु होताच मार्केटमध्ये शिंगाडे दिसू लागतात. शिंगाड्याच्या खास चवीमुळे लोकही ते आवडीने खातात. मात्र या शिंगाड्याचेही अनेक गुणकारी फायदेही आहेत.
Oct 16, 2016, 10:20 AM ISTसकाळी रिकाम्यापोटी ओव्याचे पाणी पिण्याचे 10 फायदे
घरातील किचनमध्ये सर्रास वापरला जाणारा मसाल्यातील एक पदार्थ म्हणजे ओवा. ओव्यामध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुण असतात त्यामुळेच किचनमध्येच नव्हे तर आयुर्वेदामध्येही ओव्याला मोठे स्थान आहे. ओव्यामुळे केवळ खाण्याचा स्वादच वाढत नाहीत तर पोटासंबंधित अनेक समस्याही दूर होतात.
Oct 14, 2016, 08:47 AM IST