थंडीत भरपूर खा हिरवी कोथिंबीर

भाजी, आमटी, कोशिंबीर, चटणी यात हिरवी कोथिंबीर घातल्याने त्या पदार्थाचा स्वाद वाढतो. कोथिंबीरीमुळे केवळ पदार्थाला स्वादच येत नाही तर त्यातील औषधी गुणधर्माचाही शरीराला फायदा होतो. कोथिंबीरीत प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेट, मिनरलसारखी पोषक तत्वे असतात. तसेच कॅल्शियम, फॉस्फरस, आर्यन, कॅरोटीन, पोटॅशियम आणि व्हिटामिन्सही असतात.

Updated: Nov 4, 2016, 12:26 PM IST
थंडीत भरपूर खा हिरवी कोथिंबीर title=

मुंबई : भाजी, आमटी, कोशिंबीर, चटणी यात हिरवी कोथिंबीर घातल्याने त्या पदार्थाचा स्वाद वाढतो. कोथिंबीरीमुळे केवळ पदार्थाला स्वादच येत नाही तर त्यातील औषधी गुणधर्माचाही शरीराला फायदा होतो. कोथिंबीरीत प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेट, मिनरलसारखी पोषक तत्वे असतात. तसेच कॅल्शियम, फॉस्फरस, आर्यन, कॅरोटीन, पोटॅशियम आणि व्हिटामिन्सही असतात.

कोथिंबिरीचे हे पाच फायदे

1. रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी - कोथिंबिरीत रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याची क्षमता असते. कोथिंबिरीची पावडर रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करते आणि इन्सुलिनची मात्रा वाढवते. 

2. पाचनशक्ती वाढवण्यासाठी - कोथिंबिरीमुळे पोटाच्या तक्रारी दूर होतात. पाचनशक्ती सुधारते. कोथिंबिरीचे पाने ताकात टाकून प्यायल्याने अपचन, पोटाच्या समस्या बऱ्या होतात. 

3. कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत - कोथिंबिरीत अशी काही तत्वे असतात जी कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. ज्यांना हाय कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे त्यांनी धण्याचे उकळलेले पाणी प्यावे. 

4. पिंपल्सपासून सुटका - चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर कोथिंबिरीने तुम्हाला फायदा होऊ शकतो. यासाठी कोथिंबिरीची पेस्ट करुन त्यात हळद मिसळून हा लेप पिंपल्स असलेल्या ठिकाणी लावा. यामुळे पिंपल्सची समस्या दूर होईल.

5. डोळ्यांचे तेज वाढवण्यासाठी - दररोज आहारात कोथिंबिरीचा वापर केल्यास डोळ्यांचे तेज वाढते. कोथिंबिरीत मोठ्या प्रमाणात व्हिटामिन ए असते जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते.