आप

दिल्लीत 'आप'ने शाही इमामांचा पाठिंबा नाकारला

दिल्लीत 'आप'ने आपण धार्मिक राजकारणाला तिलांजली देत असल्याचं दर्शवत, शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांचा पाठिंबा नाकारलाय.

Feb 6, 2015, 11:07 PM IST

दिल्लीतील प्रचार थंडावला, भाजपच्या जाहिरातीवरुन वादळ

दिल्लीतला प्रचार गुरुवारी संध्याकाळी शमल्यानंतर आज वर्तमानपत्रात भाजपनं जाहिराती प्रसिद्ध केल्यात. यामध्ये केंद्र सरकारच्या ८ महिन्यांच्या कारकीर्दीची वाहवा करण्यात आलीये. या जाहिरातींवर काँग्रेस आणि आम आदमी पार्टीनं जोरदार आक्षेप घेतलाय. 

Feb 6, 2015, 06:11 PM IST

दिल्लीत मोदींच्या निशाण्यावर आप, केजरीवाल...

दिल्लीत मोदींच्या निशाण्यावर आप, केजरीवाल...

Feb 4, 2015, 09:37 AM IST

काँग्रेस, आपवर नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

दिल्लीत मतदानाला काही दिवस शिल्लक असताना राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप जोरदार होत आहे. दिल्लीमध्ये कॉंग्रेसने १५ तर आम आदमी पक्षाने अर्थात आपने एक वर्षे वाया घालवले आहे, असा जोरदार हल्लाबोल करताना तुमचे स्वप्न ते माझे स्वप्न आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावनिक साद मतदारांना घातली आहे.

Feb 3, 2015, 05:43 PM IST

...म्हणून भाजपानं बेदींना निवडलं - आरएसएस

राजधानी दिल्लीत जनमत फारसं अनुकूल दिसत नसल्यानं चिंताग्रस्त भारतीय जनता पक्षानं किरण बेदींना पक्षात आणत त्यांची 'मुख्यमंत्री'पदाची उमेदवार म्हणून घोषणा केल्याची कबुली 'ऑर्गनायझर' या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रात देण्यात आली आहे. तसंच या लेखात भाजपाला धोक्याचा इशाराही देण्यात आला आहे. 

Feb 3, 2015, 12:29 PM IST

'भाजप- आप जाहिरात वॉर', केजरीवालांवर पुन्हा हल्ला

आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर जाहिरातीतून टीका करताना अण्णा हजारेंच्या फोटाला हार घातल्यानं भाजपावर टीका होत असतानाही त्यांनी केजरीवालांवर हल्ला सुरूच ठेवला आहे. 

Feb 2, 2015, 11:24 AM IST

'आरोप सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास'

आपचे नेते कुमार विश्‍वास यांनी भाजपने त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळले आहेत.  'भारतीय जनता पक्षाने माझ्यावर केलेले आरोप सिद्ध झाल्यास मी राजकारणात संन्यास घेईन' असं कुमार विश्वास यांनी म्हटलं आहे.  

Jan 31, 2015, 07:36 PM IST

बेदींवर 'विश्वास'चा तोल सुटला, भाजपकडून तक्रार दाखल

दिल्लीमधल्या प्रचारानं आता सभ्यतेची मर्यादा ओलांडल्याचं दिसतंय. आम आदमी पार्टीचे नेते कुमार विश्वास यांनी भाजपच्या उमेदवार किरण बेदी यांच्यावर टीका करताना अतिशय असभ्य भाषा वापरलीये. अश्लील टिप्पणी केल्याचा आरोप ठेवत भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी आपचे नेते कुमार विश्वास यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तर भाजपानं माझ्यावर केलेले आरोप सिद्ध झाल्यास मी राजकारणातून संन्यास घेईन, असे विश्वास यांनी ठणकावून सांगितले आहे. 

Jan 31, 2015, 06:47 PM IST

'आप'च्या जाहीरनाम्यात दिल्लीकरांवर आश्वासनांची बरसात

महिला सुरक्षा, दिल्लीत १० ते १५ लाख सीसीटीव्ही कॅमेरे, स्वस्त वीज, वाय-फाय, मुबलक पाणी, तरूणांना शिक्षण तसंच रोजगाराची संधी या आणि अशा अनेक आश्वासनांची खैरात करत अरविंद केजरीवाल यांनी आज 'आम आदमी पक्षा'चा  जाहीरनामा प्रसिद्ध केला. चार महिन्यांच्या विचारमंथनानंतर हा जाहीरनामा तयार करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. 

Jan 31, 2015, 03:13 PM IST