नवी दिल्ली: दिल्लीमधल्या प्रचारानं आता सभ्यतेची मर्यादा ओलांडल्याचं दिसतंय. आम आदमी पार्टीचे नेते कुमार विश्वास यांनी भाजपच्या उमेदवार किरण बेदी यांच्यावर टीका करताना अतिशय असभ्य भाषा वापरलीये. अश्लील टिप्पणी केल्याचा आरोप ठेवत भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी आपचे नेते कुमार विश्वास यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तर भाजपानं माझ्यावर केलेले आरोप सिद्ध झाल्यास मी राजकारणातून संन्यास घेईन, असे विश्वास यांनी ठणकावून सांगितले आहे.
BCIबाबत बेदींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना गुजरातच्या बाबाजींचा ठुल्लू मिळाल्याची मुक्ताफळं विश्वास यांनी उधळलीयेत. हे सांगताना अतिशय असभ्य अंगविक्षेप करण्यातही त्यांना काहीही वाटलेलं नाही.
प्रचारसभेदरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत विश्वास यांनी एक अश्लील टिप्पणी केली, असा आरोप बेदींनी केला असून याप्रकरणी भाजपाने निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली आहे. ' असे अनैतिक, विषारी आणि विकृत विचार करणाऱ्यांना समाजापासून दूर करण्याची गरज आहे, असं ट्विट बेदींनी केलं आहे.
A police complaint has been lodged against Kumar Vishwas' sexist comments at a recent rally in the presence of their leadership.— Kiran Bedi (@thekiranbedi) January 31, 2015
कुमार विश्वास यांनी मात्र आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. बेदी जनतेची दिशाभूल करत आहेत, त्यांनी माझे वक्तव्य लक्ष देऊन ऐकावे, आपले वक्तव्य बेदी यांना उद्देशून नव्हे तर भाजपाला उद्देशून असल्याचं स्पष्टीकरण विश्वास यांनी दिलं.
काय आहे वक्तव्य?
एका रॅलीदरम्यान कुमार विश्वास यांनी भाजपावर हल्ला चढवल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. बऱ्याच काळापासून बीजेपी अरविंद केजरीवाल यांच्यातील उणिवा शोधण्याचं काम करत आहे. त्यांना दोन उणिवा मिळाल्या. पहिली उणीव म्हणजे, केजरीवाल हे मफलर घालतात. पण केजरीवाल यांनी मफलर चोरला आहे का? असा सवाल विचारताना विश्वास दिसत आहेत आणि केजरीवाल यांच्यातील दुसरी उणीव म्हणजे ते खूप खोकतात. तुम्हाला त्याचा काय त्रास झाला, तुम्ही काय त्यांच्यासोबत त्यांच्या बेडरूममध्ये झोपता का? असा सवाल विश्वास यांनी भाजपाला विचारला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.