नवी दिल्ली : दिल्लीतला प्रचार गुरुवारी संध्याकाळी शमल्यानंतर आज वर्तमानपत्रात भाजपनं जाहिराती प्रसिद्ध केल्यात. यामध्ये केंद्र सरकारच्या ८ महिन्यांच्या कारकीर्दीची वाहवा करण्यात आलीये. या जाहिरातींवर काँग्रेस आणि आम आदमी पार्टीनं जोरदार आक्षेप घेतलाय.
या जाहिरातींच्या खर्चाबाबत दोन्ही पक्षांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. या प्रकरणी निवडणूक आयोगानं लक्ष घालावं अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दिवसरात्र मेहनत घेतल्यानंतर दिल्लीतील सर्वच मोठे नेते आता निवांत बसलेले पाहायला दिसत आहेत.
भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी या निवांत क्षणी कृष्णानगर भागातील गुरूद्वारामध्ये हजेरी लावत, लंगरमध्ये रोटी केली. तर दुसरीकडे आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल प्रचारानंतरच्या निवांत क्षणात योगा करतानाचे दृश्य पाहायला मिळाले. केजरीवाल यांनी अनुलोम-विलोम आणि कपालभातीसह अनेक योगांचे प्रकार केले. अरविंद केजरीवाल यांनी आपल्या घरातच योगासनं केलीत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.