७०० भारतीयांचे ६ हजार कोटी परदेशी बँकांमध्ये
सामाजिक कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करण्याची मालिका सुरू असून आज त्यांनी भारताचा स्वीस बँकेतील काळ्या पैशाचा काही लेखाजोखा मांडला यात त्यांनी मुकेश अंबानी, अनिल अंबांनी, काँग्रेसला टार्गेट केले आहे.
Nov 9, 2012, 01:52 PM ISTकेजरीवाल आणि खुर्शीद समर्थकांमध्ये तुफान हाणामारी
फारुखाबादमध्ये केजरीवाल विरुद्ध खुर्शीद संघर्षानं आज हिंसक वळण घेतलं. अरविंद केजरीवाल फारुखाबादमध्ये करत असलेल्या निदर्शन स्थळाजवळ काँग्रेस कार्यकर्ते आणि आयएसीचे कार्यकर्ते यांच्यात हाणामारी झाली.
Nov 1, 2012, 07:38 PM ISTखुर्शिदांच्या बालेकिल्ल्यात आज केजरीवालांचा हल्लाबोल
परराष्ट्र सलमान खुर्शीद यांचा मतदारसंघ फारुखाबादमध्ये अरविंद केजरीवाल आजपासून आंदोलन करणार आहेत. सकाळीच केजरीवाल आपल्या समर्थकांसह फारुखाबादमध्ये दाखल झालेत.
Nov 1, 2012, 11:34 AM ISTदेशाचं सरकार अंबानी चालवतात का?
देशातील सरकार अंबानी चालवत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
Oct 31, 2012, 06:39 PM ISTकाँग्रेस 'रिलायन्स'चे दलाल?- केजरीवाल
काँग्रेस हे मुकेश अंबानींचे दुकान झाले आहे. मुकेश अंबानींच्या इशाऱ्यावर देशातील सरकार चालत आहे. सरकारने रिलयान्सला १ लाख कोटींचा फायदा करून दिला आहे. गॅस दरवाढीसाठी गॅस उत्पादन निम्म्यावर आणलं गेलं आहे आदी गंभीर आरोप अरविंद केजरीवाल यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.
Oct 31, 2012, 04:40 PM ISTकेजरीवाल आज कुणाची करणार `पोल खोल`?
सामाजिक कार्यकर्ते अरविंद केजरीवाल हे आज पुन्हा एकदा भ्रष्टाचारावर नवा खुलासा करण्यासाठी तयार झाले आहेत. बुधवारी त्यांनी ट्विट केलं, “आज नवीन खुलाशासाठी तयार राहा. आजचा आरोप खूप मोठा असू सकतो.”
Oct 31, 2012, 11:00 AM ISTराखी सावंत करणार केजरीवालांची ‘पोल खोल’!
आयटम गर्ल म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत ही बेधडक विधानं करण्याबद्दल प्रसिद्ध आहे. यावेळी राखी सावंत सिनेक्षेत्रातली व्यक्ती सोडून चक्क अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. राखी सावंतने केजरीवालांना चक्क भगोडा (पळपुटा) म्हणत त्यांचा अपमान केलाय.
Oct 29, 2012, 09:45 AM ISTकेजरीवालांच्या आरोपांवर शिवसेनेची संशयाची फोडणी
भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर याचा ‘बोलविता धनी कोण ?’ याची चर्चा आता सुरु झाली आहे. गडकरींचा वारू रोखण्यासाठी हे षडयंत्र असल्याचा संशय शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलाय.
Oct 18, 2012, 07:09 PM ISTचिल्लर आरोपांना महत्व देत नाही- गडकरी
अरविंद केजरीवाल यांनी भाजप अध्यक्ष नितीन गडकरींवर केलेल्या गंभीर आरोपांना नितीन गडकरी यांनी ताबडतोब प्रत्युत्तर दिलं आहे. आपण अशा चिल्लर आरोपांना महत्व देत नाही असं सांगत नितीन गडकरी यांनी आपल्यावरील आरोप झटकायचा प्रयत्न केला आहे.
Oct 17, 2012, 07:51 PM ISTकायदेमंत्र्यांची केजरीवालांना रक्तपाताची धमकी!
वारंवार होणाऱ्या भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे काँग्रेसची अवस्था बिकट होत असल्याचं दिसू लागलंय. केजरीवालांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळं कोंडीत सापडलेल्या केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शीदांचा संयम अखेर सुटला. नेहमी अहिंसेची भाषा करणारे कायदेमंत्री सलमान खुर्शीद यांनीच केजरीवालांना धमकी देत रक्तपाताची भाषा केली आहे.
Oct 17, 2012, 04:37 PM IST१७ ऑक्टोबरला केजरीवालांचा आणखी एक धमाका
केंद्रीय कायदेमंत्री सलमान खुर्शीद यांच्या राजीनाम्याची मागणी करत जंतरमंतरवर धरणं आंदोलनाला बसलेल्या अरविंद केजरीवाल यांनी आपलं आंदोलन सध्या तरी थांबवण्याचा निर्णय घेतलाय.
Oct 15, 2012, 06:17 PM ISTकोणत्याही चौकशीला सामोरे जाऊ - खुर्शीद
आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे प्रति आव्हान केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शीद यांनी दिले आहे. इंडिया अगेस्ट करप्शनचे नेते अरविंद केजरीवाल यांनी खुर्शीद यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मात्र, खुर्शीद यांनी केलेला खुलासा योग्य नाही, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
Oct 14, 2012, 07:24 PM ISTकेजरीवालांच्या आरोपांना काँग्रेसचं उत्तर
केजरीवालांच्या आरोपांना काँग्रेसनं उत्तर दिलंय. घोटाळा झाला असेल तर त्याचे पुरावे द्या असं आव्हान काँग्रेसनं दिलंय. तसंच मिडीयाद्वारे केवळ प्रसिद्धिसाठी आरोप केले जात असल्याचा पलटवारही काँग्रेस प्रवक्ते राशिद अल्वी यांनी केलाय. तर हरियाणा सरकारनेही केजरीवालांचे आरोप फेटाळले आहेत.
Oct 9, 2012, 11:18 PM ISTडीएलएफ आणि हरियाणा सरकारचं साटंलोटं- केजरीवाल
`इंडिया अगेन्स्ट करप्शन`चे अरविंद केजरीवाल यांनी रॉबर्ट वडेरा, डीएलएफ आणि हरियाणा सरकारच्या संबंधांबाबत आणखी एक नवा गौप्यस्फोट केलाय. डीएलएफच्या सेझमध्ये रॉबर्ट वडेरा यांचे 50 टक्के शेअर्स असल्याचा दावा केजरीवालांनी केलाय.
Oct 9, 2012, 07:11 PM ISTसरकारकडे नाही कोर्टात जा - पवारांचा सल्ला
सोनिया गांधीचे जावई रॉबर्ट वढेरा यांनी बेकायदा संपत्ती गोळा केल्याचे काही पुरावे असतील तर अरविंद केजरीवाल कोर्टात जाऊ शकतात, असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलाय.
Oct 8, 2012, 01:02 PM IST