डीएलएफ आणि हरियाणा सरकारचं साटंलोटं- केजरीवाल

`इंडिया अगेन्स्ट करप्शन`चे अरविंद केजरीवाल यांनी रॉबर्ट वडेरा, डीएलएफ आणि हरियाणा सरकारच्या संबंधांबाबत आणखी एक नवा गौप्यस्फोट केलाय. डीएलएफच्या सेझमध्ये रॉबर्ट वडेरा यांचे 50 टक्के शेअर्स असल्याचा दावा केजरीवालांनी केलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 9, 2012, 07:11 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
`इंडिया अगेन्स्ट करप्शन`चे अरविंद केजरीवाल यांनी रॉबर्ट वडेरा, डीएलएफ आणि हरियाणा सरकारच्या संबंधांबाबत आणखी एक नवा गौप्यस्फोट केलाय. डीएलएफच्या सेझमध्ये रॉबर्ट वडेरा यांचे 50 टक्के शेअर्स असल्याचा दावा केजरीवालांनी केलाय.
डीएलएफ आणि हरियाणा सरकारचं साटंलोटं असल्याचा खळबळजनक आरोप केजरीवाल यांनी केलाय. हरियाणा सरकरानं हॉस्पिटलची 30 एकर जमीन डीएलएफला आंदण म्हणून दिलीय. हायकोर्टानं या जमिनीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मात्र त्याला न जुमानता ही जमीन देण्यात आलीय. तर पर्यावरण खात्याच्या मंजुरीविनाच 350 एकर जमीन हरियाणा सरकारनं डीएलएफला बहाल केल्याचाही गौप्यस्फोट त्यांनी केलाय.
हरियाणा सरकार डीएलएफचा एजंट आहे का असा सवालही केजरीवाल यांनी केलाय. या जमीन व्यवहारांबाबत हरियाणा सरकारनं श्वेत पत्रिका काढण्याची मागणी त्यांनी केलीय. तसंच मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी राजीनामा देण्याचीही मागणी केजरीवाल यांनी केलीय.