केजरीवालांच्या आरोपांना काँग्रेसचं उत्तर

केजरीवालांच्या आरोपांना काँग्रेसनं उत्तर दिलंय. घोटाळा झाला असेल तर त्याचे पुरावे द्या असं आव्हान काँग्रेसनं दिलंय. तसंच मिडीयाद्वारे केवळ प्रसिद्धिसाठी आरोप केले जात असल्याचा पलटवारही काँग्रेस प्रवक्ते राशिद अल्वी यांनी केलाय. तर हरियाणा सरकारनेही केजरीवालांचे आरोप फेटाळले आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 9, 2012, 11:18 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
केजरीवालांच्या आरोपांना काँग्रेसनं उत्तर दिलंय. घोटाळा झाला असेल तर त्याचे पुरावे द्या असं आव्हान काँग्रेसनं दिलंय. तसंच मिडीयाद्वारे केवळ प्रसिद्धिसाठी आरोप केले जात असल्याचा पलटवारही काँग्रेस प्रवक्ते राशिद अल्वी यांनी केलाय. तर हरियाणा सरकारनेही केजरीवालांचे आरोप फेटाळले आहेत.
डीएलएफ आणि हरियाणा सरकारचं साटंलोटं असल्याचा खळबळजनक आरोप केजरीवाल यांनी केला . हरियाणा सरकरानं हॉस्पिटलची 30 एकर जमीन डीएलएफला आंदण म्हणून दिलीय. हायकोर्टानं या जमिनीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मात्र त्याला न जुमानता ही जमीन देण्यात आलीय. तर पर्यावरण खात्याच्या मंजुरीविनाच ३५० एकर जमीन हरियाणा सरकारनं डीएलएफला बहाल केल्याचाही गौप्यस्फोट त्यांनी केलाय.
हरियाणा सरकार डीएलएफचा एजंट आहे का असा सवालही केजरीवाल यांनी केलाय. या जमीन व्यवहारांबाबत हरियाणा सरकारनं श्वेत पत्रिका काढण्याची मागणी त्यांनी केलीय. तसंच मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी राजीनामा देण्याचीही मागणी केजरीवाल यांनी केलीय.