खुर्शिदांच्या बालेकिल्ल्यात आज केजरीवालांचा हल्लाबोल

परराष्ट्र सलमान खुर्शीद यांचा मतदारसंघ फारुखाबादमध्ये अरविंद केजरीवाल आजपासून आंदोलन करणार आहेत. सकाळीच केजरीवाल आपल्या समर्थकांसह फारुखाबादमध्ये दाखल झालेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 1, 2012, 11:34 AM IST

www.24taas.com, फारुखाबाद
परराष्ट्र सलमान खुर्शीद यांचा मतदारसंघ फारुखाबादमध्ये अरविंद केजरीवाल आजपासून आंदोलन करणार आहेत. सकाळीच केजरीवाल आपल्या समर्थकांसह फारुखाबादमध्ये दाखल झालेत.
खुर्शीद यांच्या सामाजिक संस्थेत अपहार झाल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला होता. याप्रकरणी त्यांनी दिल्लीत आंदोलन केलं. दिल्लीतल्या आंदोलनानंतर केजरीवाल यांनी खुर्शीद यांच्या मतदारसंघात आंदोलन करण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार आजचं आंदोलन होतंय.
एका खासगी कार्यक्रमात केजरीवालांच्या या घोषणेची खिल्ली उडवताना, खुर्शीद यांनीही केजरीवाल यांना फारुखाबादमध्ये येवून दाखवाच असं आव्हान दिलं होते. त्या पार्श्वभूमीवर आज फारुखाबादमध्ये काय होणार याबाबत उत्सुककता निर्माण झाली आहे.