अण्णा हजारे

अण्णा हजारेंच्या गाडीवर नागपुरात हल्ला

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या गाडीवर आज काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला करून त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. या हल्ल्यात अण्णा सुरक्षित असून हा हल्ला युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप अण्णांचे सहकारी सुरेश पठारे यांनी झी २४ तासशी बोलताना दिली.

May 16, 2012, 07:57 PM IST

कोण करतंय सोनियांची बदनामी?

अण्णा हजारेंच्या राज्यव्यापी दौऱ्यात सोनिया आणि राहूल गांधींची बदनामी करणारी पुस्तकं वाटण्यात येतात. पण, अण्णांना मात्र याचा थांगपत्ताही नसतो. ही घटना उघडकीस आलीय भंडाऱ्यामध्ये.

May 16, 2012, 06:37 PM IST

अण्णांचा हर्षवर्धन पाटील यांच्यावर हल्लाबोल

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. हर्षवर्धन पाटील यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नसल्याचं अण्णांनी म्हटलंय.

May 11, 2012, 06:38 PM IST

मनु सिंघवींना फासावर लटकवा - अण्णा

महिलेशी अश्लील चाळे करणाऱ्या काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांना फासावर लटकवण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलीय. ते बीडमध्ये बोलत होते.

May 5, 2012, 08:59 AM IST

बाबा रामदेवांच वक्तव्य योग्यच- अण्णा

भारताच्या संसदेत खुनी मंत्री बसले आहेत असं वादग्रस्त वक्तव्य बाबा रामदेवांनी केल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनीही त्यांच्या या वक्तव्याचं समर्थन केलं आहे.

May 2, 2012, 02:57 PM IST

अण्णांच्या दौऱ्याचा शिर्डीपासून प्रारंभ

जनलोकपाल विधेयकाच्या आंदोलनानंतर सक्षम लोकायुक्ताच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आज शिर्डीपासुन आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरवात करत आहेत. अलीकडे मुंबईत झालेल्या अण्णांच्या आंदोलनाकडे जनतेने पाठ फिरवल्यामुळे हा दौरा अधिक प्रभावी करण्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे

May 1, 2012, 08:14 AM IST

राज्यातील जनतेला जागृत करणार- अण्णा

सक्षम लोकायुक्त कायद्यासाठी मैदानात उतरलेल्या अण्णा हजारेंनी नेत्यांच्या भेटीगाठीनंतर आता राज्याचा दौरा करणार असल्याची घोषणा आज पत्रकार परिषदेत केली आहे.

Apr 26, 2012, 08:22 PM IST

राज ठाकरे म्हणतात, अण्णा लक्ष द्या

अण्णा हजारे यांचे आंदोलन भ्रष्ट्राचारा विरोधात आहे, याला आमचा पाठिंबा आहे. मात्र, अण्णांनी प्रथम महाराष्ट्रात लक्ष देण्याची गजर आहे. अण्णा हे चांगले व्यक्तीमत्व आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत कोणाचे दुमत असण्याची गजर नाही, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले.

Apr 26, 2012, 03:25 PM IST

काळापैसा जनतेचा, अण्णांचे ऑगस्टला आंदोलन

महागाईला काळापैसा जबाबदार आहे. परदेशातील काळापैसा हा जनतेचा आहे. काळ्यापैशाबाबत आणि जनलोकपालला सरकार घाबरत आहे. मात्र, भ्रष्टाचारविरोधात ऑगस्टमध्ये आरपारची लढाई लढणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले. अण्णा हजारे आणि रामदेवबाबा यांचा भ्रष्टाचाराविरोधात लढा संयुक्त लढा असणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Apr 20, 2012, 04:31 PM IST

शरद पवारही झाले असते पंतप्रधान- अण्णा

शरद पवारांविषयी आपल्या मनात कोणताही राग नाही. यशवंतराव चव्हाणांचं अनुकरण पवारांनी केलं असतं तर कदाचित तेही पंतप्रधान झाले असते. अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली आहे.

Apr 5, 2012, 11:52 AM IST

भ्रष्ट मंत्र्यांप्रकरणी चौकशी समिती नेमा- अण्णा

केंद्रातील 14 भ्रष्ट मंत्र्यांप्रकरणी चौकशी समिती नेमण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी केली आहे. आम्ही केलेले सर्व आरोप खरे असून आरोप खोटे असतील तर आमच्यावर कारवाई करा. असंही अण्णा हजारेंनी सांगितलं.

Mar 28, 2012, 03:22 PM IST

'टीम अण्णांचं वक्तव्यं अपमानास्पद'

टीम अण्णाच्या आक्षेपार्ह वक्तव्यांविरोधात लोकसभेत खासदारांनी आक्रमक होत गोंधळ घातला. जेडीयु नेते यांनी लोकसभेत नोटीस बजावल्यानंतर लोकसभेत या विषयावर सर्व एकत्र आले आहेत. टीम अण्णा सदस्यांची वक्तव्यं अपमानास्पद असल्याचं संसद सदस्यांनी म्हटलं आहे. मांडण्यात आलेल्या ठरावावर आता चर्चा सुरू झाली आहे.

Mar 27, 2012, 06:26 PM IST

टीम अण्णांविरोधात लोकसभेत ठराव

संसदेतील सर्व राजकीय पक्षाचे सदस्य एकत्र येऊन आज संसदेत टीम अण्णांविरोधात ठराव मांडणार आहेत. टीम अण्णा सदस्यांची वक्तव्ये अपमानास्पद असल्याचं संसद सदस्यांनी म्हटलं आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना एक प्रकारे कोंडीत पकडण्याचा हा डाव असल्याचा आरोप अण्णा समर्थकांतून करण्यात येत आहे.

Mar 27, 2012, 11:21 AM IST

घोटाळा लपवण्यासाठीच जैनांचे पक्षांतर- खडसे

विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी सुरेशदादा जैन यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत. घोटाळ्याची माहिती शिवसेना-भाजपला होती. तसंच घोटाळा लपवण्यासाठीच जैन यांनी पक्षांतर केलं असल्याचं खडसेंना सांगितलं.

Mar 12, 2012, 03:43 PM IST

जैन यांचे सगळे घोटाळे बाहेर काढा- अण्णा

'आपण २००३ पासून घरकुल घोटाळ्यात सहभागी असलेल्या सुरेश जैन यांच्यावर कारवाई होण्यासाठी पाठपुरावा करत होतो. त्याला आता कुठे यश येत आहे', असं अण्णा यावेळी म्हणाले.

Mar 11, 2012, 09:16 PM IST