Dhanashree Verma Story : धनश्री-युझी यांच्या नात्यात दुरावा असल्याच्या चर्चेनंतर नवा VIDEO समोर

 Yuzvendra chahal and Dhanashree Verma Story : टीम इंडियाचा युवा खेळाडू फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल आणि त्याची मैत्रिण प्रसिद्ध युट्यूबर आणि डान्सर धनश्री वर्मा (Dhanashree Verma Instagram) हे जोडपे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत आहे.  

Updated: Aug 23, 2022, 03:24 PM IST
Dhanashree Verma Story : धनश्री-युझी यांच्या नात्यात दुरावा असल्याच्या चर्चेनंतर नवा VIDEO समोर title=

मुंबई :  Yuzvendra chahal and Dhanashree Verma Story : टीम इंडियाचा युवा खेळाडू फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल आणि त्याची मैत्रिण प्रसिद्ध युट्यूबर आणि डान्सर धनश्री वर्मा (Dhanashree Verma Instagram) हे जोडपे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत आहे. धनश्रीने चहल आडनाव हटविल्याने दोघांच्यात बिनसल्याची जोरदार चर्चा सुरु झाली. ही चर्चा थेट घटस्फोटापर्यंत पोहोचली. आता धनश्रीने दोघांच्या दुराव्याच्या चर्चेतनंतर नवा व्हिडिओ इस्टावर पोस्ट केलाय.

धनश्री सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय दिसून येते. तीन अनेक पोस्ट आणि व्हिडिओ तसेच फोटो अपलोटकरताना दिसून येत आहे. धनश्रीचे तिच्या इन्स्टाग्रामवर तिचा नवरा युझवेंद्र चहल याच्यासोबतचे अनेक रोमँटिक फोटो आहेत. मात्र 'मिसेस चहल'ने तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवरुन 'चहल' हे आडनाव हटवल्याने त्यांच्यात काहीतरी बिनसल्याची चर्चा सुरु झाली. ती अद्याप थांबलेली नाही.

आता धनश्री-युझी  या कपलचा एक मजेशीर व्हिडिओ समोर आला आहे. या जोडप्याने एक मजेशीर रिल शेअर केले आहे. इन्स्टाग्रामवर हे रिल क्षणार्धात व्हायरल झाले असून त्यांना पुन्हा एकदा अशाप्रकारे व्हिडिओ बनवताना पाहून त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. त्यांच्यात काही बिनसलेलं नाही, हेच यातून स्पष्ट होत आहे.

धनश्री-युझीने एका ट्रेंडिंग ऑडिओवर रिल केले आहे. ज्यात धनश्री म्हणते की, 'मी एका महिन्यासाठी माहेरी जाते. त्यावर  युझवेंद्रची प्रतिक्रिया बघण्यासारखी आहे. तो हातातील रिमोट फेकतो आणि आपल्याच धुंदीत नाचायला लागतो आणि तो गाणे म्हणतो, 'तेरी इसी अदा पे सनम, मुझको तो प्यार आया' आणि तिचे गाल ओढतो. 

या रिलमध्ये चहल त्याच्या स्टाइलमध्ये धमाल डान्सही करताना दिसत आहे. त्यांचा हा नवा व्हिडिओ आणि त्यांची मस्ती सर्वकाही सांगून जात आहे की, या दोघांमध्ये काहीही बिनसलेलं नाही.