WTC Final 2021 | कॅप्टन विराटला 'या' दिग्गजाचे विक्रम मोडीत काढण्याची संधी

 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना (World Test Championship Final 2021 )  टीम इंडिया (Team India)  विरुद्ध न्यूझीलंड (New zealand) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. 

Updated: Jun 15, 2021, 03:20 PM IST
WTC Final 2021 | कॅप्टन विराटला 'या' दिग्गजाचे विक्रम मोडीत काढण्याची संधी title=

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना (World Test Championship Final 2021 )  टीम इंडिया (Team India)  विरुद्ध न्यूझीलंड (New zealand) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. हा सामना 18-22 जून दरम्यान साऊथम्पटनमध्ये (Southmpton) खेळवला जाणार आहे. या महामुकाबल्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीकडून (Virat Kohli)  क्रिकेट चाहत्यांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा  असणार आहे. या महत्वाच्या सामन्यात विराटला सर्वश्रेष्ठ कर्णधार तसेच फलंदाज म्हणून सिद्ध करण्याची संधी आहे. या सामन्यात विराटला विक्रम करण्याची सुवर्णसंधी आहे. (wtc 2021 final team india  Virat Kohli has a chance to break Ricky Ponting's most Test centuries record as a captain)

   
नक्की काय आहे विश्व विक्रम? 

विराटने 2019 पासून आतापर्यंत कसोटी शतक लगावलेलं नाही. विराटने अखेरच शतक  2019 मध्ये बांगलादेश विरुद्ध फटकावलं होतं. विराटने या अंतिम सामन्यात शतक लगावल्यास तो वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे करेल. 

विराटने कर्णधार म्हणून आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 41 शतकं झळकावली आहेत. याबाबतीत विराट ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगसह संयुक्त स्थानावर आहे. म्हणजेच कर्णधार म्हणून विराट आणि पॉन्टिंग या दोघांनी प्रत्येकी 41 शतक पूर्ण केली आहेत. त्यामुळे विराटने या सामन्यात सेंच्युरी लगावली, तर तो असा कारनामा करणारा पहिलाच कर्णधार ठरेल. 

पॉन्टिंगच्या रेकॉर्डची बरोबरी साधण्याची संधी 

विराटला पॉन्टिंगच्या विक्रमाशी बरोबरी साधण्याची संधी आहे. पॉन्टिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांच्या बाबतीत दुसऱ्या तर विराट तिसऱ्या क्रमांकावर आहे.  पॉन्टिंगने एकूण 71 तर विराटने 70 शतकं लगावली आहेत. त्यामुळे विराटने 1 शतक लगावल्यास तो पॉन्टिंगच्या 71 शतकांच्या विक्रमाची बरोबरी साधेल.

संबंधित बातम्या : 

अनुष्कासाठी विराट पत्रकारांसोबत भांडला, BCCIने दिली वॉर्निंग

WTC 2021 अंतिम सामन्यासाठी BLACKCAPS चा संघ जाहीर, या खेळाडूंना मिळाली संधी