WPL Auction 2023: करोडोत बोली! स्मृती मंधानाची रिअ‍ॅक्शन आली समोर, पाहा VIDEO

WPL Auction 2023 Smriti Mandhana : दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या T20 वर्ल्ड कपसाठी मंधना भारतीय महिला क्रिकेट संघासोबत आहे. या सर्व खेळाडूंनी ड्रेसिंग रूममध्ये बसून संपुर्ण लिलाव एकत्र पाहिला आहे. या लिलावाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत मंधानाची रिअ‍ॅक्शन कैद झाली आहे.  

Updated: Feb 13, 2023, 05:42 PM IST
WPL Auction 2023: करोडोत बोली! स्मृती मंधानाची रिअ‍ॅक्शन आली समोर, पाहा VIDEO title=

WPL Auction 2023 Smriti Mandhana : महिला प्रीमियर लिगमध्ये ( WPL Auction)टीम इंडियाची स्टार सलामीवीर स्मृती मंधना (Smriti Mandhana) सर्वात महागडी क्रिकेटपटू ठरली आहे. कारण तिला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (royal challengers bangalore) 3.4 कोटी रुपयांना विकत घेतले. आतापर्यंत या लिलावात एकाही महिला खेळाडूला इतक्या महाग किंमतीत खरेदी करण्यात आले नाही आहे. फक्त मंधनाच महागडी ठरली आहे. दरम्यान या लिलावावर आता तिची रिअॅक्शन समोर आली आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. 

मुंबई-आरसीबीत रस्सीखेच 

स्मृती मंधनाला (Smriti Mandhana) विकत घेण्यासाठी मुंबई इंडियन्सने सर्वप्रथम बोली लावली होती. त्यानंतर आरसीबीने (royal challengers bangalore) एन्ट्री मारली होती. यावेळी दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा झाली. मंधानाला खरेदी करण्यासाठी एकूण 28 बोली लावण्यात आल्या होत्या. मुंबईने 3.20 कोटींची बोली लावून स्वतःला मागे टाकले. त्यानंतर आरसीबीने मंधानाला 3.40 कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात घेतले. 

दरम्यान दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या T20 वर्ल्ड कपसाठी मंधना भारतीय महिला क्रिकेट संघासोबत आहे. या सर्व खेळाडूंनी ड्रेसिंग रूममध्ये बसून संपुर्ण लिलाव एकत्र पाहिला आहे. या लिलावाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत मंधानाची रिअॅक्शन कैद झाली आहे.  

जिओ स्पोर्ट्सने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मंधाना तिच्या सहकाऱ्यांसोबत लिलाव पाहताना दिसत होती. यावेळी लिलावात सर्वात पहिले नाव स्मृती मंधानाचे (Smriti Mandhana) होते. यावेळी तिला आरसीबीने 3.40 कोटी रुपयांना खरेदी केले. मंधनाला लागलेली ही करोडोची बोली पाहून ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंनी जल्लोश केला. तसेच कॅप्टन हरमनप्रीत कौरने तिला मिठी मारली. तर अनेक खेळाडूंनी तिचे अभिनंदन केले. 

दरम्यान स्मृती मंधानाला (Smriti Mandhana) खरेदी करू न शकणाऱ्या मुंबई इंडियन्सने टीम इंडियाच्या महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला विकत घेतले आहे. मुंबईने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू आणि यूपी वॉरियर्सचा पराभव करत हरमनप्रीत कौरला 1.80 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. 

महिला प्रीमियर लीग (WPL) साठीचा पहिला लिलाव आज मुंबईच्या जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) प्रथमच आयपीएलच्या धर्तीवर या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी सज्ज आहे. यापूर्वी, महिला टी20 चॅलेंज स्पर्धा 'महिला आयपीएल' म्हणून खेळली गेली होती ज्यामध्ये फक्त तीन महिला संघ होते. बीसीसीआयने ते रद्द केले आणि पाच संघांच्या महिला प्रीमियर लीगची घोषणा केली. WPL 2023 लिलावासाठी निवडलेल्या 409 खेळाडूंपैकी 246 भारतीय आहेत. आठ सहयोगी देशांसह 163 खेळाडू परदेशी आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे खेळाडू सर्वाधिक आहेत.