'सारा.. सारा..' घोषणाबाजीने मुंबईकर शुभमनला चिडवत असतानाच विराटने हात दाखवला अन्...; पाहा Video

Video Virat Kohli On Sara Sara Chants: भारतीय संघ वानखेडेच्या मैदानावर जिंकणार हे जवळपास निश्चित झाल्यानंतर चाहत्यांनी शुभमनला चिडवण्यासाठी 'सारा... सारा...' अशी घोषणाबाजी सुरु केली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 4, 2023, 02:02 PM IST
'सारा.. सारा..' घोषणाबाजीने मुंबईकर शुभमनला चिडवत असतानाच विराटने हात दाखवला अन्...; पाहा Video title=
वानखेडेच्या मैदानावर घडला हा प्रकार

Video Virat Kohli On Sara Sara Chants: विराट कोहली नुसता मैदानात उपस्थित असला तरी भारतीय चाहत्यांना चेव फुटतो. धावांचा पाठलाग करणं असो किंवा टार्गेट सेट करणं असो किंवा फिल्डींग असो विराट सगळीकडेच आघाडीवर असतो. फिल्डींग करताना अगदी एक धाव रोखण्यासाठीही विराट जिवाचा आटापिटा करतो. फलंदाजी करताना विराटचं एकाऐवजी हळूच 2 रन काढण्याचं कौशल्यही सर्वांना ठाऊक आहे. विराट मैदानात असतानाच जे काही करतो त्याला चाहत्यांचा प्रतिसाद मिळतो. मग ते मैदानातील चाहते असो किंवा ऑनलाइन मॅच पाहणारे चाहते असोत. 

विराट गाण्यावर नाचला

मैदानामध्ये विराट असताना वेगवेगळ्या अँगलने मॅच कव्हर करणारे कॅमेरे अनेकदा त्याची छोट्यात छोटी हलचालही टीपण्याच्या प्रयत्नात असतात. विराट कधी मैदानात नाचतो तर कधी चाहत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आरडाओरड करण्यासाठी हातवारे करतो. भारत आणि श्रीलंकेदरम्यान मुंबईतील वानखेडेच्या मैदानात झालेल्या सामन्यातही असं अनेकदा पाहायला मिळालं की विराटने काहीतरी केलं आणि चाहत्यांनी त्याला प्रतिसाद दिला. किंवा चाहत्यांनी काहीतरी आरडाओरड करुन मागणी केली आणि विराट त्यावर व्यक्त झाला. विराट अगदी 'माय नेम इज लखन' या गाण्यावरही नाचला. 

बॉलिंगच्या मागणीवरही झाला व्यक्त

केवळ डान्सच नाही सामन्यात एका क्षणी 'कोहली को बॉलिंग दो' असं चाहते सॅण्डमधून ओरडत होते. त्यावेळी विराटने हरभजन सिंगच्या गोलंदाजीच्या अॅक्शनप्रमाणे अॅक्शन करत प्रतिसाद दिला. 

शुभमन शेजारी विराट होता उभा

इतकंच नाही तर हा सामना पाहण्यासाठी भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि त्याची कन्या सारा तेंडुलकरही उपस्थित होती. भारताच्या फलंदाजीच्या वेळेस शुभमन गिलबरोबरच श्रेयस अय्यरने केलेल्या फटकेबाजीला टाळ्या वाजवून सारा प्रतिसाद देताना दिसली. मात्र भारतीय संघ फिल्डींग करत असताना विराट कोहली स्लीपला उभा होता तर गिल सेकेण्ड स्लीपमध्ये उभा होता. श्रीलंकन संघाची अवस्था 3 धावांवर 4 बाद अशी असल्याने जवळपास प्रत्येक बॉलवर कॅच येईल अशाप्रकारे विराट आणि शुभमन अगदी सावधपणे स्लीपमध्ये उभे होते.

सारा... सारा... घोषणा ऐकल्यानंतर विराटने...

श्रीलंकन संघाच्या 28 धावांवर 8 विकेट्स गेल्यानंतर चरिथा अस्लंका आणि अँजलो मॅथ्यूजने नवव्या विकेटआधी बराच वेळ भारतीय गोलंदाजांना झुंजवलं. चरिथा आणि अँजलोने 6.2 ओव्हर आपला संघर्ष कायम ठेवला. याचवेळेस विराट आणि शुभमन स्लीपमध्ये बाजूबाजूला उभे राहून कॅचची वाट पाहत होते. तेव्हा चाहत्यांनी अचानक शुभमनला डिवचण्यासाठी 'सारा... सारा...' अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. या घोषणा ऐकून विराटने चाहत्यांकडे पाहत हातवारे करुन हे काय चाललं आहे असा प्रश्न विचारला. त्यानंतर विराटने शुभमनकडे हात दाखवत याच्या नावाने ओरडा असं सांगितलं. विराटचा आदेश ऐकत लगेच चाहत्यांनी, 'शुभमन... शुभमन...' अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. 

1)

2)

विराट आणि शुभमनने या सामन्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या चेंडूवर बाद झाल्यानंतर 189 धावांची पार्टरनशीप केली. यामुळे भारताला 357 धावांपर्यंत मजल मारता आली. श्रीलंकेचा संघ 55 धावांवर बाद झाला.