Woman Premier League: महिला प्रीमियर लीगसाठी (Woman Premier League) जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. महिला क्रिकेटपटूंचा (Woman Cricketers) 13 फेब्रुवारी रोजी मुंबईतच (Mumbai) लिलाव होणार असून, यामध्ये एकूण 409 खेळाडूंचा लिलाव होईल. दरम्यान खेळाडूंच्या लिलावाची पद्धतही निश्चित करण्यात आली आहे. भारताच्या हरमनप्रीत (Harmanpreet), स्मृती मानधनासह (Smriti Mandhana) एकूण 24 खेळाडूंची सर्वाधिक 50 लाख रुपये इतकी मूळ किंमत निश्चित करण्यात आली आहे. या लिलावासाठी एकूण 1525 खेळाडूंची नोंदणी करण्यात आली होती. यामधून अंतिम यादी तयार करण्यात आली असून त्यांची मूळ किंमत ठरवण्यात आली आहे.
महिला प्रीमियर लीगदरम्यान महिलांची ट्वेन्टी- २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू असेल. पारंपारिक प्रतिस्पर्धी असणारा भारत आणि पाकिस्तान संघ 12 फेब्रुवारीला आमने-सामने असणार आहे. दरम्यान त्याच्या दुसऱ्या दिवशी खेळाडूंचा लिलाव होणार आहे.
सर्वाधिक 50 लाख मूळ किंमत मिळालेल्या खेळाडूंमध्ये 13 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये एलिस पेरी, सोफी एक्लेस्टोन, सोफी डिव्हाईन, डिआंड्रा डॉटिन या प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे. दरम्यान दुसऱ्या क्रमांकासाठी 40 लाख मूळ किंमत निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये 30 खेळाडूंचा समावेश आहे.
सर्वात आधी नवोदित खेळाडूंचा लिलाव होणार आहे. त्यासाठी 10 आणि 20 लाख मूळ किंमत निश्चित करण्यात आली आहे. लीगमध्ये सहभागी पाच संघांना खेळाडूंच्या खरेदीसाठी प्रत्येकी 12 कोटी रुपये खर्चाची मर्यादा असेल. प्रत्येक संघ 15 ते 18 खेळाडूंची निवड करु शकतो. मुंबईतील ब्रेबॉर्न आणि डी. वाय. पाटील स्टेडियमवर सर्व सामने पार पडणार आहेत.
महिला प्रीमियर लीग 2023चा लिलाव Sports 18 टीव्ही चॅनेल्सवर तुम्ही पाहू शकता.
Jio Cinema वेबसाईट आणि अॅपवर तुम्ही महिला प्रीमियर लीग लिलावाचं Live Streaming पाहू शकता.