मुंबई : वेस्टइंडीज विरूद्धचा पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाने 308 धावांचा डोंगर उभारला आहे. कर्णधार शिखर धवनची 97 धावा आणि गिल, अय्यरच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर टीम इंडियाने 308 धावसंख्या गाठलीय. त्यामुळे आता वेस्टइंडीज समोर 309 धावांचे लक्ष्य असणार आहे. वेस्टइंडीज गोलंदाज गुडाकेश मोटीने 2 विकेट तर जायडेन ने 1 विकेट घेतली.
वेस्टइंडिजचा कॅप्टन निकोलस पूरनने टॉस जिंकत फिल्डिंगचा निर्णय घेतला. त्यामुळे टीम इंडीया प्रथम फलंदाजीला उतरली होती. शिखर धवन आणि शुभमन गिलने भारताच्या डावाला चांगली सुरूवात करून दिली होती. शुभमन गिलने 53 बॉलमध्ये 64 धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 2 षटकार लगावले आहेत. शिखर धवनचं शतक हुकलं आहे. धवनने 99 बॉलमध्ये 97 धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 3 षटकार लगावले आहेत. श्रेयस अय्यरने 54 धावा ठोकल्या. सुर्यकुमार 13, संजू 12, दिपक हुडा 27, अक्षर पटेलने 21 धावा केल्या आहेत. या धावांच्या बळावर टीम इंडियाने 308 धावसंख्या गाठलीय.
दरम्यान आता वेस्टइंडीज समोर 309 धावांचे लक्ष्य असणार आहे. त्यामुळे वेस्टइंडीज ही धावसंख्या पुर्ण करून मालिकेत पहिल्या विजयाची नोंद करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.