रविंद्र जडेजाच्या 'द रॉकस्टार' नावामागचा 'तो' किस्सा तुम्हाला माहितय का?

सर जडेजा असा झाला रॉकस्टार, हा खास किस्सा तुम्हाला माहीत आहे का?

Updated: Mar 9, 2022, 08:47 PM IST
रविंद्र जडेजाच्या 'द रॉकस्टार' नावामागचा 'तो' किस्सा तुम्हाला माहितय का? title=

मुंबई: भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या कसोटी सामन्यात रविंद्र जडेजानं अष्टपैलू कामगिरी केली आहे. आपल्या धडाकेबाज फॉर्मने श्रीलंकेच्या खेळाडूंना घाम फोडला आहे. श्रीलंकेविरुद्ध नाबाद 175 धावा आणि 5 विकेट्स घेण्याचा विक्रम त्याने केला. जडेजाचं जगभरात कौतुक होत आहे. 

सर जडेजा, जड्डू, पन्टर यासारखी अनेक नावं जडेजाची आहेत. पण जडेजाचं आणखी एक टोपणनाव फार कमी लोकांना माहीत आहे. हे नाव दिग्गज क्रिकेटपटूकडून मिळालं आहे. जेव्हा जडेजा 2008 मध्ये आयपीएलमध्ये सहभागी झाले तेव्हाच शेन वॉर्न यांना त्याच्या कौशल्य आणि फॉर्मवर अति विश्वास होता. 

जडेजाच्या स्टाईल आणि कामगिरीमुळे कमी कालावधीमध्ये जास्त हिट ठरला. त्यावेळी राजस्थान रॉयल्स संघाने पहिल्या टप्प्यातील पुरस्कार पटकवण्याचा मान मिळवला होता. त्यामध्ये जडेजानं फिनिशरची भूमिका निभावली होती. त्यामुळे शेन वॉर्नला तो आवडायला लागला. त्याला वाटायचं द रॉकस्टार या नावाने जडेजाला ओळखलं जावं.

शेन वॉर्नचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. ही बातमी जेव्हा जडेजाला समजली तेव्हा त्याने आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं हे खूप वाईट झालं. ही बातमी स्तब्ध करणारी आहे. ही बातमी ऐकून मी सुन्न झालो आहे. ही बातमी मला खरी वाटत नाही. मी त्यांच्यासोबत आयपीएलमध्ये खेळू शकलो हे भाग्य होतं.

वॉर्नसोबत ड्रेसिंग रूममधील चर्चा आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी या युवकांसाठी खूप महत्त्वाच्या असायच्या. वॉर्नने मला एक मोठा मंच दिला. अंडर-19 मधून आयपीएलमध्ये खेळण्याची संधी दिली अशी माहिती जडेजानं दिली आहे. 

जडेजानं श्रीलंके विरुद्ध जबरदस्त कामगिरी केली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याआधी श्रीलंकेचे खेळाडू घाबरले आहेत. जडेजाने गेल्यावर्षीच्या आयपीएल मौसमातही धमाकेदार कामगिरी करते चेन्नईला विजेतेपदापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुकर करून दिला होता.