वीरेंद्र सेहवागला मिळाली मोठी जबाबदारी

भारतीय क्रिकेट टीमचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याला खेळाशी संबंधित एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. 

Updated: Nov 10, 2017, 05:17 PM IST
वीरेंद्र सेहवागला मिळाली मोठी जबाबदारी title=

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीमचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याला खेळाशी संबंधित एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. 

क्रिकेट सामन्यामध्ये कमेंट्री करणाऱ्या सेहवागला (नाडा) च्या डोपिंग विरोधी अपील पॅनलचा सदस्य बनवण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर सेहवागच्या बॅटींगला सगळेच मिस करतात.

पहिल्या स्थानावर खेळण्यासाठी येणाऱ्या सेहवाग समोर आजपर्यंत अनेक गोलंदाजांना बॉलिंग करतांना भीती वाटायची. भल्या भल्या गोलंदाजांना सेहवाग आपल्या कडक शॉटने गार करायचा.

क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर सेहवाग ट्विटरवर देखील खूप अॅक्टीव झाला आहे. त्याचे ट्विट हे आज चर्चेचा विषय ठरत आहेत. हटके ट्वि्ट करण्यासाठी देखील त्याला ओळखलं जावू लागले आहे. पण आता सेहवागला आणखी एक जबाबदारी मिळाली आहे.