मुंबई वनडेत दुहेरी शतक लगावणार विराट कोहली

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होतेय. या मालिकेतील पहिला सामना मुंबईतल्या वानखेडे मैदानावर होतोय. 

Updated: Oct 22, 2017, 11:39 AM IST
मुंबई वनडेत दुहेरी शतक लगावणार विराट कोहली title=

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होतेय. या मालिकेतील पहिला सामना मुंबईतल्या वानखेडे मैदानावर होतोय. 

टीम इंडिया या मालिकेतही विजयी लय कायम राखण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे न्यूझीलंड मोठ्या कालावधीनंतर वनडे खेळतेय आणि भारतातील त्यांची कामगिरीही सुमार अशीच राहिलेली आहे. 

भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठी ही वनडे खास आहे. २००८मध्ये करियर सुरु करणारा विराट कोहली आज २००वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे.

विराटने आपल्या कारकिर्दीत १९९ वनडे सामने खेळलेत. यात ३० शतकांसह त्याने ८७६७ धावा पूर्ण केल्यात. विराटने जर या मालिकेत २२३ धावा केल्या तर त्याचे वनडेतील ९ हजार धावा पूर्ण होतील.  तसंच ९ हजार धावा पूर्ण करणारा तो सहावा भारतीय क्रिकेटर बनेल.