Virat Kohli Viral Video: नॉर्वे ग्रुपसह थिरकला विराट; किंग कोहलीचा हिप-हॉप Dance पाहिला का?

Virat Kohli Viral Video: क्विक स्टाईल डान्स ग्रुपमध्ये (Quick Style Dance Group) विराट स्टिरिओ नेशनच्या इश्क गाण्यावर डान्स करताना पहायला मिळतोय. विराटचा डान्स पाहून अनुष्का म्हणते की...

Updated: Mar 15, 2023, 05:24 PM IST
Virat Kohli Viral Video: नॉर्वे ग्रुपसह थिरकला विराट; किंग कोहलीचा हिप-हॉप Dance पाहिला का? title=
Virat Kohli,Dance Video

Virat Kohli Dance Video: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात येत्या 17 मार्चपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. बॉर्डर गावस्कर मालिका खिशात घातल्यानंतर आता कसोटी वर्ल्ड कप (WTC 2023) जिंकण्याचं स्वप्न टीम इंडियाने उराशी बाळगलं आहे. अशातच आता टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) याचा एक व्हिडिओ (Dance Video) सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

विराट कोहली याचा प्रसिद्ध नॉर्वे डान्स ग्रुपसोबतच्या (Norwegian Dance Group) डान्सचा व्हिडिओ पहायला मिळत आहे. या व्हिडिओत विराट कोहली डान्स ग्रुपसोबत हिप-हॉप डान्स करताना दिसतोय. क्विक स्टाईल डान्स ग्रुपमध्ये (Quick Style Dance Group) विराट स्टिरिओ नेशनच्या इश्क गाण्यावर डान्स करताना पहायला मिळतोय.

पाहा Video -

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Quick Style (@thequickstyle)

विराटच्या डान्सवर अनुष्काची प्रतिक्रिया 

बॉटिंगच्या पोसिशनमध्ये बॉट हातात घेऊन विराट थिरकताना (Virat Kohli Dance Video) दिसतोय. त्याचा हा अजबगजब डान्स पाहून अनेकांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने (Anushka Sharma) देखील तीन फायर इमोजीसह व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.

विराट खरंच आजारी?

ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकी खेळीनंतर विराटची पत्नी आणि अभिनत्री अनुष्का शर्माने खास ट्विट केलंय. तिच्या या पोस्टनुसार, विराट कोहलीने आजारी (Virat Kohli Health Update) असून शतक झळकावलं. त्यावरून वाद पेटला होता. अक्षर पटेलने विराट आजारी नसल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे अनुष्काच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह लगावले जात होते. त्यानंतर आता विराट आजारी नसल्याचं पहायला मिळालं आहे.

आणखी वाचा - Virat Kohli खरंच आजारी आहे का? पत्नी अनुष्काची ती पोस्ट खरी की खोटी?

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघामध्ये 7 जून 2023 रोजी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम (WTC Final) सामना खेळला जाईल. त्यावेळी विराटचा फॉर्म महत्त्वाचा ठरणार आहे. तर आगामी वनडे वर्ल्ड कपमध्ये (ODI WC 2023) विराटची कामगिरी टीम इंडियासाठी महत्त्वाचा पैलू ठरू शकते.