रोहितला विराटचं उत्तर, डबल सेंच्युरीसाठी मागितला सल्ला

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली सध्या पत्नी अनुष्का शर्मासोबत हनीमूनला गेलाय. त्यामुळे टीम इंडियाच्या नेतृत्वाची जबाबदारी सध्या हिटमॅन रोहित शर्मा सांभाळत आहे.

Updated: Dec 19, 2017, 04:12 PM IST
रोहितला विराटचं उत्तर, डबल सेंच्युरीसाठी मागितला सल्ला title=

नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली सध्या पत्नी अनुष्का शर्मासोबत हनीमूनला गेलाय. त्यामुळे टीम इंडियाच्या नेतृत्वाची जबाबदारी सध्या हिटमॅन रोहित शर्मा सांभाळत आहे.

तिकडे १२ डिसेंबरला विराट आणि अनुष्काला रोहितने फेसबुकवरुन शुभेच्छा दिल्या होत्या. दोघांनाही रोहितने प्रत्येक एक एक सल्ला दिला होता. त्यावर विराटने रिप्लाय दिलाय. 

काय म्हणाला विराट?

रोहित शर्माने दिलेल्या सल्ल्यावर अनुष्का शर्माने उत्तर दिलं होतं. अनुष्काने रोहितच्या ट्विटला उत्तर देत लिहिले की, ‘धन्यवाद रोहित! आणि शानदार खेळीसाठी तुला शुभेच्छा!’. तेव्हा यावर विराटचा काहीही रिप्लाय आला नव्हता. आता विराटने रोहितच्या प्रश्नाला रिप्लाय दिलाय. विराटने रोहित शर्माला गंमतीत डबल सेंच्युरीचं हॅंडबुक शेअर करण्यास सांगितले. 

रोहितचा धमाका....

विराट सुट्टीवर असताना टीम इंडियाचं नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. मोहालीच्या दुस-या वनडे सामन्यात श्रीलंके विरूद्ध रोहितने नाबाद २०८ रन्सची खेळी केली. हे वनडे क्रिकेटमधील त्याचं तिसरं दुहेरी शतक होतं. विराट आणि अनुष्काने ११ डिसेंबरला इटलीमध्ये लग्न केलं. 

श्रीलंके विरूद्ध टेस्ट आणि वनडे सीरिज संपल्यावर रोहित शर्माची नजर टी-२० सीरिज जिंकण्यावर होती. पहिला टी-२० सामना बुधवारी कटकमध्ये खेळला जाणार आहे. भारताने तिथे आतापर्यंत केवळ एकच टी-२० सामना खेळला आहे. या सामन्यात साऊथ आफ्रिकेचा पराभव झाला होता.