दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याअगोदर गांगुलीने रहाणेबाबत केलं मोठ वक्तव्य

भारतीय क्रिकेट टीमचा दक्षिण आफ्रिकेचा दौरा हा येत्या ५ जानेवारी रोजी सुरू होत आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 19, 2017, 12:30 PM IST
दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याअगोदर गांगुलीने रहाणेबाबत केलं मोठ वक्तव्य  title=

पुणे : भारतीय क्रिकेट टीमचा दक्षिण आफ्रिकेचा दौरा हा येत्या ५ जानेवारी रोजी सुरू होत आहे. 

टीम इंडिया भरपूर दिवसांनी विदेशी दौरा करत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यानंतर टीम इंडियाला इंग्लंड आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जायचं आहे. आता टीम इंडियाने आता श्रीलंकेसोबत तीन सामने टी २० ची सिरीज खेळायची आहे. तसेच आता भारताने श्रीलंका विरूद्धच्या वनडे सामन्यात विजय मिळवला आहे. मात्र आता सगळ्या चर्चा या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याला घेऊन होत आहे. 

काय म्हणाले सौरभ गांगुली?

यावरूनच माजी भारतीय कॅप्टन सौरव गांगुलीने मोठ वक्तव्य केलं आहे. सौरव गांगुलीच्या म्हणण्यानुसार अजिंक्य रहाणेचा खराब परफॉर्मन्स हा दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याला काही अफेक्ट करणार नाही. टीम इंडियाला याची खास चिंता करण्याची गरज नाही. 
रहाणेने श्रीलंका विरूद्धच्या सामन्यात पाच इनिंगमध्ये फक्त १७ रन्स बनवले. असे असले तरीही रहाणेचा बाहेरच्या दौऱ्यांवरील रेकॉर्डला पाहता दक्षिण आफ्रिका दौरा हा चांगला खेळला जाईल अशी आशा आहे. गांगुलीने बंगाल आणि दिल्लीमध्ये होणाऱ्या रणजी ट्रॉफी सेमीफायनल मॅचच्या दरम्यान पीटीआयशी चर्चा केली. तेव्हा त्यांनी सांगितले की, मला नाही वाटत की अजिंक्य रहाणेचा आता फॉर्म हा चिंतेचा विषय आहे. कारण तो उत्तम खेळाडू आहे. 

विराट कोहली, रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि मुरली विजय या अगोदरही दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. आणि महत्वाची बाब म्हणजे ते उत्तम खेळाडू म्हणून या दौऱ्यात लोकप्रिय झाले. त्यामुळे गांगुली रहाणेच्या अगोदरच्या खेळावर खूष आहेत म्हणून त्याने आता देखील चांगली कामगिरी करणं आवश्यक आहे.