South Africa vs India : भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव झाला. भारताच्या दुसऱ्या डावात फलंदाजांनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. विराट कोहली (Virat Kohli) वगळता इतर कोणत्याही खेळाडूला मैदानात तग धरता आलं नाही. त्यामुळे तिसऱ्याच दिवशी टीम इंडियाचा खेळ खल्लास झालाय. मात्र, या सामन्यातील खेळीमुळे 146 वर्षाच्या क्रिकेट इतिहासात कोणालाही जमलं नाही, अशी कामगिरी विराट कोहलीने केली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराट कोहलीने पहिल्या डावात 38 धावा आणि दुसऱ्या डावात सर्वाधिक 76 धावा केल्या. या खेळीमुळे कोहलीने 2023 मध्ये सर्व फॉरमॅटमध्ये एकूण 2048 धावा केल्या. विराट कोहलीने सातव्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात 2000 धावांचा टप्पा ओलांडला आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर विराटने श्रीलंकेचा माजी यष्टीरक्षक फलंदाज कुमार संगकाराचा रेकॉर्ड देखील मोडीस काढलाय. कुमार संगकाराने सहाव्यांदा असा पराक्रम गाजवला होता. तर विराटने 7 व्यांदा अशी कामगिरी केलीये.
सचिन तेंडुलकर, महेला जयवर्धने आणि जॅक कॅलिस यांनी 5 वेळा 2000 हून अधिक धावा रचण्याचा विक्रम केलाय. तर रिकी पाँटिंग आणि सौरव गांगुली यांनी एका कॅलेंडर वर्षात प्रत्येकी चार वेळा 2000 धावांचा आकडा पार केला आहे. मात्र, विराट या सर्वांपेक्षा अधिक ताकदीने विक्रम रचताना दिसतोय.
दुसऱ्या सामन्यासाठी संभाव्य प्लेइंग इलेव्हन
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन) : डीन एल्गर, एडन मार्कराम, टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नंद्रे बर्गर.
भारत (प्लेइंग इलेव्हन) : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), आवेश खान, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.