नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने फिटनेसची व्याख्या बदलली तर कर्णधार विराट कोहलीने फिटनेसला एका नवा दृष्टिकोन दिला आहे. सध्या विराट कोहली जगातील सर्वात फिट खेळाडूंपैकी एक आहे. फिटनेस म्हणजे केवळ जिममध्ये घाम गाळणे नाही तर दिवसभरात तुम्ही काय काय खाता हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
जेव्हा क्रिकेटचा सामना नसतो तेव्हा रोज विराट दिवसातील ४ तास जिममध्ये असतो आणि त्याचबरोबर तो त्याच्या डाएट देखील काटेकोरपणे पाळतो.
अलीकडेच एका चॅट शो मध्ये त्याचे फिटनेसबद्दलचे प्रेम दिसून आले. फिट राहण्यासाठी त्याने गेल्या चार वर्षांपासून बटर चिकन खाल्लेले नाही. त्याचबरोबर गोड पदार्थांपासून देखील तो लांबच राहतो.
विराटने सांगितले की, त्याच्या दिवसाची सुरुवात ३ अंड्यांच्या ऑम्लेटने होते. त्याच्यासोबत तो पालक, चीज देखील घेतो. पपई, टरबूज ही फळे अवश्य घेतो आणि पेयांमध्ये ग्रीन टी विथ लेमन.
कॅलरीज नियंत्रित ठेवण्याच्या अनुषंगाने त्याचा डाएट चार्ट ठरवण्यात आला आहे. दुपारी जेवणात तो ग्रिल चिकन, मॅश पोटॅटो, स्पिन्च आणि व्हेजीस खातो. आवश्यकतेनुसार मसल्स वाढण्यासाठी आहारात रेड मीटचे प्रमाण वाढवण्यात येते.
रात्री झोपण्यापूर्वी तो हलका आहार घेणे पसंत करतो. सी फूड घेण्यावर त्याचा भर असतो. डाएट मात्र काटेकोरपणे पाळतो, असे तो म्हणाला.