श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी फॉर्मात असलेल्या या खेळाडूला विश्रांती

श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलीये. दरम्यान हा संघ दोन सामन्यांसाठी  जाहीर करण्यात आलाय. 

Updated: Nov 10, 2017, 06:08 PM IST
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी फॉर्मात असलेल्या या खेळाडूला विश्रांती  title=

नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलीये. दरम्यान हा संघ दोन सामन्यांसाठी  जाहीर करण्यात आलाय. 

या संघात करण्यात आलेला विशेष बदल म्हणजे हार्दिक पांड्या. भारतीय संघातील फॉर्मात असलेला क्रिकेटर हार्दिक पांड्याला पहिल्या दोन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आलीये. 

 या दौऱ्यात तीन कसोटी, तीन वनडे आणि तीन टी-२० सामने खेळणार आहे. २४ डिसेंबरला हा दौरा संपेल. 

श्रीलंका २००९नंतर भारतात पहिला कसोटी सामना खेळणार आहे. भारतात श्रीलंकेची कामगिरी तितकीशी चांगली राहिलेली नाही. आतापर्यंत ते भारतात १७ कसोटी खेळलेत. त्यापैकी १० सामन्यांत त्यांना हार पत्करावी लागली. तर ७ सामने ड्रॉ राहिले. 

कर्णधार दिनेश चंदीमलसाठी हा दौरा नक्कीच कठीण असणार आहे. भारतीय भूमीत तो पहिली कसोटी खेळणार आहे. 

पहिल्या दोन सामन्यांसाठी संघ - विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, वृद्धिमन साहा, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शामी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा