इंग्लंडमध्ये मिळणाऱ्या सुविधांबाबत विराट नाराज

चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात झालीये. भारताचा पहिला सामना ४ जूनला पाकिस्ताविरुद्ध होतोय. या सामन्यासाठी अवघे तीन दिवस उरलेत. हा सामना एजबेस्टन स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. मात्र सामन्याआधीच एजबेस्टनमधील सुविधांबाबत भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाराजी व्यक्त केलीये.

Updated: Jun 1, 2017, 06:05 PM IST
इंग्लंडमध्ये मिळणाऱ्या सुविधांबाबत विराट नाराज title=

लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात झालीये. भारताचा पहिला सामना ४ जूनला पाकिस्ताविरुद्ध होतोय. या सामन्यासाठी अवघे तीन दिवस उरलेत. हा सामना एजबेस्टन स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. मात्र सामन्याआधीच एजबेस्टनमधील सुविधांबाबत भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाराजी व्यक्त केलीये.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्णधार विराट कोहली एजबेस्टनमधील सुविधांबाबत नाखुश होता. त्यामुळे नाराज झालेल्या विराट कोहलीने मध्येच प्रॅक्टिस सेशन अर्ध्यावर सोडले.

मात्र २५ मिनिटांनंतर तो पुन्हा प्रॅक्टिस करण्यासाठी आला. गेल्या काही दिवसांपासून भारतीय चमूमध्ये सगळं काही व्यवस्थित नसल्याचं चित्र आहे. सुरुवातीला कर्णधार विराट कोहली आणि कोच अनिल कुंबळे यांच्यातील मतभेद झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर आता इंग्लंडमध्ये भारतीय संघाला देण्यात येत असेलल्या सुविधांबाबत विराट नाराज आहे.