कोहली आता नव्या अंदाजात बॉलर्सला करणार शांत

श्रीलंकेला धूळ चाखायला लावलेल्या टीम इंडिया बुधवारी टी २० मध्ये खेळणार आहे. भारतीय संघ या दौऱ्यावर आतापर्यंत एक देखील मॅच हरलेली नाही. दोन्ही संघ आर प्रेमदासा स्टेडिअममध्ये एकमेकांच्या समोरासमोर येणार आहेत. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Sep 6, 2017, 05:21 PM IST
कोहली आता नव्या अंदाजात बॉलर्सला करणार शांत   title=

नवी दिल्ली : श्रीलंकेला धूळ चाखायला लावलेली टीम इंडिया बुधवारी टी २० मध्ये खेळणार आहे. भारतीय संघ या वन डे सिरीजमध्ये हरलेला नाही. दोन्ही संघ आर प्रेमदासा स्टेडिअममध्ये एकमेकांच्या समोरासमोर येणार आहेत. 

श्रीलंकेवर उत्तम विजय मिळवल्यानंतर कॅप्टन विराट कोहलीची सगळीकडे चर्चा होत आहे. एवढंच काय तर एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर होत आहे. या व्हिडिओत विराट कोहली आपल्याला श्रीलंकेच्या गल्लीत क्रिकेट खेळताना दिसत आहे. व्हिडिओतील सगळ्यात खास गोष्ट ही आहे की कोहली डाव्या हाताने खेळत आहे. कोहली कायम उजव्या हाताने खेळतो हे आपल्या सगळ्यांना माहितच आहे. त्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. खासियत म्हणजे तो उजव्या हाताने खेळणारा असून देखील तो डाव्या हाताने देखील उत्तम खेळत आहे. 

या व्हिडिओत सरळ दिसतंय की कोहली श्रीलंकेच्या गल्लीत क्रिकेट खेळत आहे. आपली रोजची सवय मोडून वेगळ्या पद्धतीने क्रिकेट खेळताना त्याला अनेक लोकं पाहायला उभे आहेत. एवढंच काय तर या अशा वेगळ्या पद्धतीने खेळूनही कोहलीचे शॉट अगदी कौतुकास्पद आहेत. यामुळे आता कोहली नव्या पद्धतीने खेळण्यासाठी देखील सज्ज आहे, असं म्हणायला हरकत नाही. विराट आपल्या या अंदाजात देखील खेळला तर तो नव्या गेमने बॉलर्सला नक्कीच शांत करू शकतो. 

कोहलीने वनडे सिरिजमध्ये उत्तम खेळ दाखवला. ५ सामन्यात कोहलीने ११०.८६ च्या रन रेटने ३३० धावा केल्या. या दरम्यान त्याने २ शतक आणि १ अर्धशतक देखील केलं.