Syed Mushtaq Ali Trophy : भारतात सुरु असलेली वर्ल्डकप 2023 स्पर्धा (World Cup) निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने (Team India) जबदस्त कामगिरी करत सेमीफायनलचे तिकीट मिळवलं आहे. दुसरीकडे, बीसीसीआयने आयोजित केलेल्या 'सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी'मध्ये रिंकू सिंहने (Rinku Singh) धुमाकूळ घातला आहे. या स्पर्धेतील पंजाब विरुद्ध उत्तर प्रदेश (Punjab vs Uttar Pradesh) यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीचा सामना गुरुवारी मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या उत्तर प्रदेशच्या रिंकू सिंहने नाबाद 77 धावा केल्या आहेत. रिंकू सिंहची तुफानी फलंदाजी पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2023 च्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात उत्तर प्रदेशने पंजाबविरुद्ध 20 षटकात 3 गडी गमावून 169 धावा केल्या. उत्तर प्रदेशच्या संघाला ही धावसंख्या गाठण्यात रिंकू सिंहने महत्त्वाची भूमिका बजावली. रिंकूने 233.33 च्या स्ट्राइक रेटने आक्रमक फलंदाजी केली. रिंकूने अर्शदीप सिंहची जबरदस्त धुलाई करत त्याच्या एका षटकात 3 षटकार ठोकले आणि 23 धावा केल्या.
उत्तर प्रदेशकडून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रिंकू सिंहने 33 चेंडूत 4 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 77 धावा केल्या. एक वेळ अशी होती जेव्हा रिंकू सिंह 21 चेंडूत 38 धावांवर खेळत होता. मात्र 18व्या षटकानंतर रिंकू सिंहने आपला फॉर्म बदलला. यानंतर रिंकू सिंहने पुढच्या 3 षटकात 5 षटकार ठोकले.
Rinku Singh masterclass in Syed Mushtaq Ali Trophy:
77 in just 33 balls with 4 fours and 6 sixes for Uttar Pradesh. He's in phenomenal touch, the finisher Rinku...!!!pic.twitter.com/78nEKiUGuO
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 2, 2023
दरम्यान, आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या डावात 21 चेंडूंत 38 धावा करून सामनावीर ठरलेल्या रिंकू सिंहने आशियाई क्रीडा स्पर्धेत नेपाळविरुद्ध 15 चेंडूंत 37 धावांची झंझावाती खेळी खेळून भारताची धावसंख्या 200 च्या पुढे नेली होती. त्या सामन्यात यशस्वी जैस्वालने शतक झळकावले होते पण केवळ रिंकूच्या खेळीमुळे भारताला चांगली धावसंख्या उभारता आली होती. या सामन्यात भारतीय संघाने 23 धावांनी विजय मिळवला होता.