विराटपूर्वी 'या' भारतीय खेळाडूंनी गाठलाय 100 टेस्ट सामन्यांचा विक्रमी टप्पा!

भारताकडून 100 टेस्ट सामने खेळणारा विराट 12 खेळाडू आहे.

Updated: Mar 4, 2022, 10:20 AM IST
विराटपूर्वी 'या' भारतीय खेळाडूंनी गाठलाय 100 टेस्ट सामन्यांचा विक्रमी टप्पा! title=

मुंबई : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने आज एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. श्रीलंकेविरूद्धची पहिली विराट कोहलीसाठी त्याच्या कारकिर्दीतील 100 टेस्ट मॅच आहे. दरम्यान विराट कोहलीपूर्वी 11 भारतीय खेळाडूंनी हा ऐतिहासिक टप्पा गाठण्याचा विक्रम केला आहे. भारताकडून 100 टेस्ट सामने खेळणारा विराट 12 खेळाडू आहे.

भारताकडून 100 टेस्ट सामन्यांटा टप्पा गाठणारे सुनिल गावस्कर हे पहिले खेळाडू आहेत. तर भारताकडून सर्वा जास्त टेस्ट सामने खेळण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. त्याने टीम इंडियाकडून 200 कसोटी सामने खेळलेत.

भारतासाठी 100 किंवा त्याहून अधिक सामने खेळारे खेळाडू

  • सचिन तेंडुलकर- 200 मॅच
  • राहुल द्रविड़- 163 मॅच
  • वीवीएस लक्ष्मण- 134 मॅच
  • अनिल कुंबळे- 132 मॅच
  • कपिल देव- 131 मॅच
  • सुनील गावस्कर- 125 मैच
  • दिलीप वेंगसरकर- 116 मॅच
  • सौरव गांगुली- 113 मॅच
  • इशांत शर्मा- 105 मॅच
  • हरभजन सिंह- 103 मॅच
  • वीरेंद्र सहवाग- 103 मॅच

दरम्यान भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाकडून सोशल मीडियावर एक व्हिडीयो जाहीर करण्यात आला आहे. या व्हिडीयोमध्ये विराट म्हणतो, खरं सांगायचं तर मी कधी विचार केला नव्हता की, मी 100 टेस्ट सामने खेळू शकेन. हा माझ्यासाठी खूप लांबचा प्रवास होता.