BCCI Selection Committee: बीसीसीआयने (BCCI) शुक्रवारी संध्याकाळी मोठा निर्णय घेतला. बीसीसीआयने सिलेक्शन कमिटी (National Selectors) बरखास्त केलीये. टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World cup) पदरी पडलेल्या पराभवानंतर टीमच्या सिलेक्शनवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यानंतर बीसीसीआयने ही अॅक्शन घेतली. तर यावेळी टीम इंडियाचा माजी खेळाडू अजित आगरकर (Ajit Agarkar) नवे निवड समितीच्या अध्यक्षपदाच्या रेसममध्ये असल्याचं समोर आलं होतं.
दरम्यान याव्यतिरीक्त नव्या निवड समितीचा शोध सुरू असून त्यासाठी अनेक नावं समोर येतायत. या नावांनुसार टीम इंडियाचे पुढील सिलेक्टर्स बनू शकतात. नुकतंच माजी क्रिकेटपटू अजित आगरकरचे नाव पुढे आलं होतं. तर आता या यादीत आणखी काही नवीन नावांची भर पडलीये.
टीम इंडियाने माजी क्रिकेटपटू नयन मोंगिया यांनी एका वेबसाईटशी बातचितमध्ये पुष्टी केलीये. यामध्ये त्यांनी राष्ट्रीय निवडकर्ता पदासाठी अर्ज करणार असल्याचं म्हटलंय. त्यांच्याशिवाय माजी क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन आणि सलील अंकोला हे देखील या शर्यतीत सहभागी होण्याची दाट शक्यता आहे.
इनसाईड स्पोर्टने दिलेल्या माहितीनुसार, अजित आगरकर यांच्याशी याविषयी काहीही बातचीत होऊ शकलेली नाही. ते जर या पदासाठी अर्ज करू इच्छित असतील तर ही संपूर्णपणे त्यांची चॉईस असेल. गेल्यावेळी ते अध्यक्षपदाच्या फार जवळ होते, मात्र त्यांना संधी मिळाली नाही. मुख्य म्हणजे ते युवा असून त्यांच्याकडे तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळण्याचा अनुभव आहे.
बीसीसीआयने सर्व निवडकर्त्यांची (National Selectors) हकालपट्टी केली आहे. तसंच नवीन अर्ज मागवले आहेत. बीसीसीआयने यासंदर्भात एक ट्विट करत ही माहिती दिली आहे. चेतन शर्मा (Chetan Sharma) यांच्या नेतृत्वातील निवड समितीच्या सर्व सदस्यांची हकालपट्टी करण्यात आली असून सर्व चार जागांसाठी नव्याने अर्ज मागवले आहेत. नवीन जागांवर नियुक्ती होईलपर्यंत चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीच काम पाहाणार आहे.
चेतन शर्मा (उत्तर विभाग) यांच्याबरोबर हरविंदर सिंह (मध्य विभाग), सुनील जोशी (दक्षिण विभाग) आणि देबांशीष मोहंती (पूर्व विभाग) यांचा निवड समितीत समावेश होता. यांच्यातील काही सदस्यांची नियुक्ती 2020 मध्ये करण्यात आली होती.
बीसीसाआयने आपल्या ट्विटमध्ये राष्ट्रीय निवड समितीच्या चार जागांसाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2020 आहे.