Football World Cup 2022 : आजपासून फुटबॉलचा महाकुंभ सुरू, Opening ceremony ला नोराचा तोरा!

Nora Fatehi: FIFA World Cup 2022 मध्ये तब्बल 32 देशांनी सहभाग घेतला आहे. कतारमध्ये होणाऱ्या या वर्ल्ड कपच्या उद्घाटन सोहळ्यासाठी ( opening ceremony) अनेक सेलिब्रिटींची मंदियाळी दिसणार आहे.

Updated: Nov 20, 2022, 05:27 PM IST
Football World Cup 2022 : आजपासून फुटबॉलचा महाकुंभ सुरू, Opening ceremony ला नोराचा तोरा! title=
Nora Fatehi

Nora Fatehi Perform in FIFA opening ceremony: जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ असलेल्या फुटबॉलच्या (Football) महाकुंभास आजपासून सुरूवात होत आहे. आजपासून FIFA World Cup 2022 कतारमध्ये खेळला जाणार असल्याने फुटबॉल चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रथमच फुटबॉल विश्वचषक मध्यपूर्वेच्या देशात आयोजित केला जातोय. वर्ल्ड कपचा पहिला सामना आज Qatar vs Ecuador यांच्यात खेळला जाणार आहे.

FIFA World Cup 2022 मध्ये तब्बल 32 देशांनी सहभाग घेतला आहे. कतारमध्ये होणाऱ्या या वर्ल्ड कपच्या उद्घाटन सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रिटींची मंदियाळी दिसणार आहे. FIFA विश्वचषक 2022 चा उद्घाटन सोहळा अल बायत स्टेडियमवर (Al Bayt Stadium) होणार आहे. यजमान कतार आणि इक्वेडोर यांच्यातील सलामीचा सामनाही याच स्टेडियमवर होणार आहे.

आणखी वाचा - Cristiano Ronaldo: फायनलपर्यंत जायचं कसं? FIFA World Cup 2022 पूर्वी रोनाल्डोचा सल्ला, म्हणाला...

समोर आलेल्या माहितीनुसार, या उद्घाटन सोहळ्यात अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) देखील परफॉर्म करणार आहे. काही दिवसांपूर्वी नोरा या वर्षीच्या अधिकृत FIFA गाण्यात दिसली होती. "लाईट द वर्ल्ड" हे गाणं आणि तो व्हिडिओ चांगलाच गाजला होता. त्यामुळे आता चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

पाहा ट्विट - 

दरम्यान, या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक आणि रॉकस्टार शकिरा (Shakira) देखील येणार असल्याची चर्चा आहे. मात्र, यावर अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. कतारने (Qatar) बऱ्याच वर्षांपूर्वीपासून विश्वचषकाच्या  (Football World Cup) तयारीला सुरुवात केली होती. त्यानंतर आता कतारला वर्ल्ड कप आयोजनाचा सन्मान मिळाला आहे.