मुंबई : 2017 मध्ये अनेकदा विजय संपन्न करून टीम इंडिया 2018 ची सुरूवात करत आहे.
टीम इंडिया आफ्रिका दौऱ्यासाठी केपटाऊन पोहोचले आहेत. सुरूवातीला टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या 3 टेस्ट मॅच होणार आहेत. सिरीजची पहिली टेस्ट मॅच 5 जानेवारीला सुरू होणार आहे. टीम इंडिया मुंबईहून बुधवारी रवाना झाली होती.
टीम इंडियाचे सदस्य येथे पोहोचल्याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला होता. या व्हिडिओत फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार आपल्या पत्नीसोबत दिसणार आहेत. ईशांत शर्मा आणि चेतेश्वर पुजारा देखील हॉटेलमध्ये जाताना दिसले.
शिखर धवन देखील टीमसोबत जाताना दिसला. चांगली गोष्ट ही आहे की, त्यांच्या चालण्याचा अंदाज अगदी साधा होता. कारण असं सांगण्यात आलं होतं की, पायात दुखापत झाल्यामुळे धवन नीट चालू शकत नाही. यामुळे बहुदा त्याला पहिल्या टेस्टमध्ये बाहेर बसावं लागेल. फास्ट बॉलर उमेश यादवदेखील आपल्या पत्नीलासोबत घेऊन गेला आहे.
After a long flight #TeamIndia make their way to the team hotel here in Cape Town, South Africa pic.twitter.com/lFr3ktBvlX
— BCCI (@BCCI) December 28, 2017
या व्हिडिओला बघण्याचा खरा आनंद हा आहे की, प्रत्येकाकडे एक - एक बॅग आहे. मात्र आताच अनुष्का शर्मासोबत विवाहबद्ध झालेला विराट कोहलीच्या हातात मात्र दोन बॅगा दिसत आहेत. एवढंच काय तर त्याच्या पाठीवर देखील एक बॅग आहे. यावेळी विराटसोबत अनुष्का देखील गेली आहे. या सगळ्यांसोबत टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री देखील पोहोचले आहेत.