T20 World Cup : टी20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये (Semi Final) हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) धुवाँधार फलंदाजीच्या जोरावर भारताने 168 धावांचं आव्हान इंग्लंडसमोर (England) ठेवलं. हार्दिक पांड्याने अवघ्या 33 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 4 फोरची बरसात करत 63 धावा केल्या. भारतातर्फे हार्दिक पांड्याने सर्वाधिक धावा केल्या. विशेषत: शेवटच्या षटकांमध्ये हार्दिक पांड्याने तुफान फटकेबाजी केली.
हार्दिक पांड्याचा फिटनेस
हार्दिक पांड्या खेळाबरोबरच आपल्या फिटनेस (Fitness) आणि डाएटवर (Diet) विशेष लक्ष देतो. हार्दिक जगात कुठेही खेळायला गेला तरी तो आपल्या खाजगी शेफला (Personal Chef) आपल्या बरोबर घेऊन जातो. ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठीही हार्दिकने आपल्या शेफला बरोबर नेलं आहे.
ऑस्ट्रेलियात टीम इंडिया ज्या हॉटेलमध्ये थांबते त्या हॉटेलमध्ये हार्दिक आपल्या शेफसाठी खास रुम घेतो. मैदानात उतरण्याआधी हार्दिकला काय खायला आवडतं? फिटनेससाठी हार्दिकचा डाएट प्लान काय असतो, याबाबत जाणून घेऊया.
हार्दिक पांड्याचा डाएट
हार्दिक पांड्याच्या खासगी शेफचं नाव आहे आरव नांगिया. नांगिया सध्या हार्दिकबरोबर ऑस्ट्रेलियात आहे आणि हार्दिकसाठी तो खास डाएट प्लान तयार करतो. हार्दिकला जेवणात खिचडी आवडते आणि तीही मूग डाळीची. खिचडी बनवण्याची नांगियाची विशेष पद्धत आहे. थोडासा मसाला आणि तुफाचा तडका असलेली खिचडी हार्दिकला जास्त आवडते.
क्रिकेटच्या मैदानावर जास्त काळ टिकायचं असेल तर फिटनेस महत्वाचा असतो. यासाठी सरावाबरोबरच योग्य डाएट महत्त्वाचं असल्याचं हार्दिक म्हणतो. फिटनेस आणि डाएटशी कोणताही तडजोड करत नाही त्यामुळेच कोणत्याही देशात खेळायला गेल्यावर खासगी डाएटला बरोबर नेत असल्याचं हार्दिकने म्हटलं आहे. डाएटबरोबर पुरेशी झोपही महत्वाची असल्याचं पांड्याचं म्हणणं आहे.
सामन्याच्यावेळी हार्दिकचं डाएट
सामन्याच्यावेळी हार्दिकटं खास असं डाएट असतं. यासाठी नांगिया साधं पण योग्य आहारावर भर देतात. सामना नसेल त्या दिवशी हार्दिकला 3 हजार कॅलेरीचं जेवण बनवतो. पण सामन्याच्यावेळी मैदानावर एनर्जी जास्त खर्च करावी लागते, त्यामुळे यादिवशी पांड्याच्या आहारात 4 हजार कॅलरीचं मिळेल असं जेवण असतं अशी माहिती नांगियाने दिली आहे.
नांगिया यांनी दिलेल्या माहितीनुसार हार्दिकला जास्त चमचमीत किंवा मसाले असलेले पदार्थ आवडत नाहीत. तसंच पांड्याला शाकाहरी जेवण आवडत. विशेषत: त्याच्या जेवणात मूग डाळीच्या खिचडीचा समावेश असतो. याशिवाय पांड्याला जीरा राईसही आवडतो. विशेष म्हणजे हार्दिकला वेळेवर नाश्ता आणि जेवण लागत असल्याचंही नांगियाने सांगितलं.