T20 World Cup सेमीफायनलमध्ये पाऊस पडलाच तर पुढे काय, कोण ठरेल विजेता?

T20 World Cup 2022 Semifinals : आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 (ICC T20 World Cup 2022) च्या सुपर-12 च्या रोमांचक लढतीनंतर आता सर्व क्रिकेट चाहत्यांच्या नजरा सोमीफायनल लढतींकडे लागल्या आहेत. सेमीफायनलमध्ये ग्रुप-1 मधून इंग्लंड आणि न्यूझीलंड क्वालिफाय झाले आहे, तर ग्रुप-2 मधून भारत आणि पाकिस्तानने धडक मारली आहे.  

Updated: Nov 7, 2022, 10:44 AM IST
T20 World Cup सेमीफायनलमध्ये पाऊस पडलाच तर पुढे काय, कोण ठरेल विजेता? title=

T20 World Cup 2022 Semifinals and final matches date : ऑस्ट्रेलियात खेळला जात असलेल्या टी-20 विश्वचषक 2022 अखेरच्या टप्प्यात पोहोचला आहे. सुपर-12 च्या अंतिम सामन्यानंतर सेमीफायनलमध्ये (T20 World Cup 2022 Semifinals) प्रवेश करणाऱ्या चार संघाची नावे स्पष्ट झाली आहेत. यामध्ये सुपर-12 च्या ग्रुप-1 मधून न्यूझीलंड आणि इंग्लंडने उपांत्य फेरी (T20 World Cup 2022 Semifinals and final matches date) आहे, तर ग्रुप-2 मध्ये भारता सहा गुणांवरच सेमीफायनलसाठी (Semifinals full Schedule) क्वालिफाय झाला. यानंतर पाकिस्तानने बांगलादेशचा 5 विकेट्सने पराभव करून 6 गुणांसह उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सर्वाधिक 8 गुणांसह पोहोचलेला भारत एकमेव देश आहे.

मात्र यादरम्यान ऑस्ट्रेलियासह अनेक मोठ्या संघांचा खेळ पावसाने खराब केला आहे. आता प्रश्न पडतो की जर पावसाने उपांत्य आणि अंतिम फेरीत (Semifinal and Final match) अडथळा आणला, तर विजेते कसे ठरवायचे.  टी-20 विश्वचषकाच्या गट सामन्यांनंतर न्यूझीलंड आणि इंग्लंडने गट 1 मधून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्याचबरोबर भारत आणि पाकिस्तानचे (Ind vs Pak) संघ गट २ मधून अंतिम चारमध्ये पोहोचले आहेत. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी होणार आहेत. 

वाचा : आला थंडीचा महिना! हिवाळा सुरू होण्यापूर्वीच 'या' गोष्टी लक्षात ठेवा, तब्येत ठणठणीत राहील 

उपांत्य फेरीत पाऊस पडला तर कोण विजेता ठरेल

सेमी फाइल मॅचमध्ये पाऊस पडला तर काय? या एकाच गोष्टीची सर्वांनाच चिंतेत टाकले आहे. आयसीसीने (ICC) सर्व बाद फेरीच्या सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवला आहे. याचा अर्थ अतिरिक्त दिवस म्हणजे जर पावसामुळे सामना 9 नोव्हेंबर खेळला गेला नाही तर हा सामना 11 नोव्हेंबरला पूर्ण होऊ शकतो. राखीव दिवशीही पावसाने सामना होऊ दिला नाही, तर गटात अव्वल स्थानी असलेला संघ पुढे जाईल. या कारणास्तव, उपांत्य फेरीचा सामना गटातील पहिल्या संघाने दुसऱ्या गटातील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाशी केला आहे.

फायनलमध्ये पावसाने मॅच धुऊन काढली, तर विजेता कोण ठरेल

भारत-पाकिस्तान यांच्यातील फायनलची आशा चाहत्यांच्या मनात जागृत झाली आहे. पण जेव्हा दोन्ही संघ आपापले उपांत्य फेरीचे सामने जिंकतील तेव्हाच होईल. तसेच, फायनलमध्ये रिझर्व्ह डेला सामना होऊ शकला नाही तर ट्रॉफी कोणाला मिळणार. हा प्रश्नही प्रत्येकाच्या मनात आहे. त्यामुळे आयसीसीच्या नियमांनुसार येथेही तोच नियम लागू असेल. अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या दोन संघांपैकी जो गटात अव्वल असेल तो विजेतेपदावर नाव कोरू शकणार आहे. 

वाचा : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत मोठी बातमी; जाणून घ्या नवे दर 

सेमीफायनल आणि फायनलचे वेळापत्रक

पहिला सेमीफायनल सामना : न्यूझीलंड आणि पाकिस्तान (New Zealand and Pakistan) यांच्यात 9 नोव्हेंबर रोजी पहिला सेमीफायनल सामना होणार आहे. हा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता खेळवला जाईल.

दुसरा सेमीफायनल सामना : भारत आणि इंग्लंड (India and England) याच्यात 10 नोव्हेंबर रोजी दुसरा सेमीफायनल सामना होईल. हा सामना अॅडिलेड क्रिकेट ग्राउंडवर भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता खेळवला जाईल.

फायनल सामना : या स्पर्धेचा फायनल सामाना 13 नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता खेळवला जाईल.