" इथेच सर्व सिक्रेट सांगू?..." पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादवने मीडियालाच केला उलट प्रश्न; जाणून घ्या कारण

Suryakumar Yadav Press Conference: 22 जानेवारीपासून कोलकातामध्ये सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील T20 मालिकेपूर्वी  पत्रकार परिषद झाली. ही पत्रकार परिषद गाजली ते सूर्यकुमारच्या एका वक्तव्यच्यामुळे, जे ऐकून सगळेच शांत झाले. 

तेजश्री गायकवाड | Updated: Jan 22, 2025, 11:59 AM IST
" इथेच सर्व सिक्रेट सांगू?..." पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादवने मीडियालाच केला उलट प्रश्न; जाणून घ्या कारण title=
Photo Credit: screen grab , JioCinema

India vs England T20I: भारत विरुद्ध  इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची  T20I मालिकेला आजपासून अर्थात 22 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. पहिला T20I सामना आज  कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्याने पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. पण ही पत्रकार परिषद गाजली ते सूर्यकुमारच्या एका वक्तव्यच्यामुळे, जे ऐकून सगळेच शांत झाले. चला नक्की काय झालं ते जाणून घेऊयात. 

सामनापूर्व परिषदेत सूर्यकुमार यादव नक्की काय म्हणाला?

नेहमीप्रमाणे सामन्याच्या आधी पत्रकार परिषद झाली. यावेळी या मालिकेमध्ये भारतीय संघाचा कर्णधार असलेलय सूर्यकुमार यादवने अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. या पत्रकार परिषदेत त्याला पत्रकारांकडून विचारण्यात आलं की "तुमचा गेम प्लॅन काय आहे?" यावर सूर्या म्हणाला की, "मी इथेच सर्व सिक्रेट सांगू का? मी फक्त माझ्या खेळाचा आनंद घेत आहे. आम्हाला एक संघ तयार करायांचा आहे. आम्ही एकजुटीने खेळू पाहत आहोत. याकडे आमचे प्रशिक्षक गौतम गंभीर आणि माझे लक्ष आहे." 

हे ही वाचा: मोफत, मोफत, मोफत...! भारतीय चाहत्यांसाठी गुड न्यूज , IND vs ENG दुसऱ्या T20 साठी 'हे' तिकीट खरेदी करावे लागणार नाही

 

उप-कर्णधार अक्षर पटेल काय म्हणाला? 

पण, भारतीय टीमचा उप-कर्णधार अक्षर पटेलला सर्व खेळाडूंच्या कामगिरीचे मूल्यमापन करायचे होते.  त्याने खेळाडूंच्या वेगाचे महत्त्व लक्षात घेतले. या अष्टपैलू खेळाडूने असेही सांगितले की 2024 हे वर्ष मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ब्लू इन ब्लूसाठी चांगले आहे आणि त्याला आशा आहे की खेळाडू त्याच पद्धतीने प्रगती करू शकतील.

हे ही वाचा: Ind v Eng: आजपासून सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड T20I सामन्याआधी जाणून घ्या हवामान आणि पिच रिपोर्ट

 

अक्षर पुढे म्हणाला की, "विश्वचषक वर्षभरावर येत आहे, त्यामुळे त्याआधी आमची प्रगती कशी होईल यासाठी आम्हाला आतापासून ते प्रयत्न करायचे आहेत. हेच मुख्य ध्येय आहे. गती ही मोठी गोष्ट आहे कारण तुम्ही चांगली सुरुवात केली तर तुम्ही ती चालू ठेवू शकता." आम्ही 2024 चांगले पूर्ण केले, त्यामुळे आम्हाला या मालिकेतही गती वाहायची आहे.”

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कॅप्टन), हार्दिक पंड्या, नितीश कुमार रेड्डी, रिंकू सिंग, अक्षर पटेल/ वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती/ रवी बिश्नोई

हे ही वाचा: 2 तास 37 मिनिटांचा 'तो' चित्रपट, ज्याने सर्व ॲक्शन-थ्रिलर चित्रपटांवर फिरवले पाणी; याच्यापुढे 'महाराजा'ही झाला फेल

इंग्लंडची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

बेन डकेट, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), जोस बटलर (कॅप्टन), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, गस ऍटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड