ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच केला घात! 12 लाख घेऊन अभिनेत्रीचा CA फरार; म्हणाली, '2 वर्षांची...'

Divyanka Tripathi 12 Lakh Scam:  दिव्यांका त्रिपाठीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्यासोबत झालेल्या फसवणूकीविषयी अभिनेत्रीनं केला खुलासा... 

दिक्षा पाटील | Updated: Jan 22, 2025, 02:11 PM IST
ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच केला घात! 12 लाख घेऊन अभिनेत्रीचा CA फरार; म्हणाली, '2 वर्षांची...' title=
(Photo Credit : Social Media)

Divyanka Tripathi 12 Lakh Scam: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीनं आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. अभिनयाच्या जोरावर तिनं प्रेक्षकांच्या मनात स्वत: चं स्थान निर्माण केलं आहे. मालिकांनंतर आता दिव्यांकानं ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील स्वत: चं नशिब आजमावलं आहे. त्यासोबत दिव्यांकानं तिच्यासोबत झालेल्या एका स्कॅमविषयी खुलासा केला. त्यावेळी तिनं सांगितलं की एका चार्टेड अकाऊंटंटनं तिच्याकडून 12 लाख रुपये घेतले आणि तो पळून गेला. त्यानंतर दिव्यांकानं त्याला कसं बसं शोधून काढलं. पण जास्त काही झालं नाही. 

दिव्यांका त्रिपाठीनं 'हिंदी रश' ला नुकतीच मुलाखत दिली. त्यावेळी दिव्यांकानं खुलासा केला की 'बनूं मैं तेरी दुल्हन ही माझी पहिली मालिका होती. त्याच्या सेटवर एक CA होते. ते आमच्या सेटवरील इतर अभिनेत्रींचं अकाऊंट सांभाळायचे. महत्त्वाचं म्हणजे हा त्या काळातील एक स्कॅम होता आणि तो माझ्यासोबत झाला. दोनवर्ष त्यानं माझं अकाऊंट व्यवस्थित सांभाळलं. त्यावेळी मी 20-20, 24-24 तास काम करायचे. तर माझ्याकडे वेळ देखील नव्हता की मी कोणत्या CA कडे जाऊन त्यांच्याकडे सगळी विचारपूस करू. आता हा CA दुसऱ्या शहरातून यायचा. त्यांनी मला काही FD (Fix Deposite) मध्ये काही पैसे टाकण्यास सांगितले, तो म्हणाला की तू कुठे खर्च देखील करत नाहीस. तुमच्या टॅक्सचं कसं काय होणार. महत्त्वाचं म्हणजे खर्च होत नव्हता कारण खर्च करण्यासाठी वेळ हवा जो नव्हता. त्यावेळी तर ऑनलाइन असा काही प्रकार देखील नव्हता. तर त्यामुळे त्याच 2-3 कपड्यांनी माझे दिवस जात होते. कारण सेटवर जाऊन त्यांचेच कपडे परिधान करायचो.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

दिव्यांकानं याविषयी सविस्तर सांगत पुढे म्हणाली, 'तर त्यानं माझे काही FD बनवले. मी चार चेक साइन केले, एक बॅंकेच्या नावावर. तर काही फॉर्म्स भरले, ज्यात वरती माझंच नाव होतं आणि खाली माझं नावं होतं. बाकी पानं खाली होती. त्यांनी सांगितलं की इतर मी भरेन. तुम्ही चिंता करु नका. दोन-तीन ठिकाणी तुमचं नाव भरा. सही केली आणि त्यानंतर ती व्यक्ती गायब झाली. 12 लाख रुपये होते. त्यावेळी तर मी खूप कमी कमवायचे. जे काही कमावलं होतं ते 2 वर्षात त्यातही 12 लाख रुपये.  ती व्यक्ती हे सगळे पैसे घेऊन पळाली. त्यानंतर मी त्याला फोन करत राहिले.'

हेही वाचा : 'हेरा फेरी 3' च्या शूटिंगला कधी होणार सुरुवात? अक्षय कुमार म्हणाला, 'सगळं काही...'

पुढे त्याच्याविषयी सांगताना दिव्यांका म्हणाली, 'कसं तरी एका मित्राला त्याच्या शहरात पाठवलं आणि कसे बसे हूल-पट्टी दाखवत त्याच्याकडून 4 चेक काढून घेतले. पण त्यातले 3 चेक हे बाउंस झाले आणि फक्त एक चेक उरला. तर 9 लाख रुपयांचं माझं नुकसान झालं. मी त्याच्या विरोधात चेक बाउंसिंगची तक्रार दाखल केली. पण त्या प्रकरणावर एकानंतर एक अशी कोर्ट तारिख देत राहिलं. माझे वडील भोपाळवरून आले की आपण त्याच्याविरोधात केस लढूया कारण मला त्यासाठी कामातून वेळ मिळत नव्हता. पण जो वकील होता तोपण त्यांच्या बाजून गेल. कारण त्यानं मला सांगितलं की सगळी कागदपत्र ही गायब झाली आहेत. त्यानं एक दिवस अचानक फोन केला आणि सांगितलं की मॅडम तुमच्या सगळ्या फाइल या गायब झाल्या आहेत. काही शिल्लक राहिलंच नाही. त्यानंतर आम्ही हार मानली. जेव्हा शो बंद झाला तेव्हा असं वाटलं की बरं झालं असतं जर माझ्याकडे ते पैसे राहिले असते. त्यानंतर मला पैशांसाठी छोट्या-छोट्या जाहिराती देखील कराव्या लागल्या.'