मस्तच! 1 लाखांचं बजेट असेल, तर एक नव्हे पाहा पाच स्टायलिश बाईकचे पर्याय

Auto News : बाईक घेण्याच्या प्रयत्नात आहात? लाखाभराच्या किमतीतील या बाईक देतील महागड्या बाईकना टक्कर... पाहा तुम्हाला कोणची बाईक आवडतेय... 

सायली पाटील | Updated: Jan 22, 2025, 02:56 PM IST
मस्तच! 1 लाखांचं बजेट असेल, तर एक नव्हे पाहा पाच स्टायलिश बाईकचे पर्याय  title=
Bikes Under 1 Lakh budget know the list auto news

Bikes Under 1 Lakh: गेल्या काही वर्षांमध्ये भारतामध्ये बाईकप्रेमींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामध्ये तरुणांची संख्या मोठी असून, बहुतांश तरुणांनी खिशाला परवडणाऱ्या दरात मिळणाऱ्या बाईकना पसंती दिली, पण त्यासोबतच या मंडळींनी स्टायलिश बाईकचा पर्यायही निवडला. अशाच बाईकच्या शोधात असणाऱ्यांसाठी खालील पाच पर्याय बाईक निवडण्यात मदत करतील हे नक्की. 

Hero Xtreme 125R

हिरो मोटर्सनं हल्लीच Hero Xtreme 125R ही बाईक मार्केटमध्ये लाँच केली. या बाईकची किंमत आहे ₹95,000. ही बाईकची एक्स शोरुम किंमत असून, तिचं एबीएस मॉडेल 99, 500 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. 125 सीसीच्या दमदार इंजिनासह ही बाईक 11.4 बीएचपी पॉवर आणि 10.5 एनएम टॉर्क जनरेट करते. 

TVS Raider

हिरोच्याच दमदार बाईकला टक्कर देण्यासाठी टीव्हीएसनं रेडर 125 सीसी ही बाईक लाँच केली आहे. वजनानं अतिशय हलकी असल्यानं ही बाईक चर्चेचा विषय असून, तिची प्रारंभिक किंमत आहे ₹85,000. बाईकच्या टॉप मॉडेलची एक्स शोरुम किंमत आहे ₹1,04,471. या बाईकमध्ये ग्राहकांना iGO असिस्ट टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. 

Honda SP 125

1 लाख रुपयाच्या आत होंडाची SP 125 ही बाईकही एक उत्तम पर्याय आहे. 125cc इंजिन असणारी ही बाईक 10.7 bhp पॉवर आणि  10.9 एनएम टॉर्क जनरेट करत असून, तिची किंमत 87, 468 रुपयांपासून 91, 468 रुपयांपर्यंत आहे. 

Bajaj Pulsar N125

बजाजची Pulsar N125 ही बाईक 1 लाखांच्या आत खरेदी करणं शक्य असून, तरुणांची ही आवडती बाईक ठरत आहे. या बाईकसाठी साधारण ₹94,707-₹98,707 इतकी रक्कम मोजावी लागते. 

हेसुद्धा वाचा : एलॉन मस्क इतका श्रीमंत झाला तरी कसा? खरंच या 5 Idea ठरल्या गेम चेंजर? 

Bajaj Freedom CNG

पल्सरशिवाय बजाजनं सीएनजीमध्ये Bajaj Freedom लाँच केली आहे. ही बाईक पेट्रोलनंही चालते, जिच्यासाठी  ₹89,997 ते  ₹1.09 लाख रुपये इतकी रक्कम मोजावी लागते.