मला फार मजा आली... चहलसोबत झालेल्या त्या घटनेनंतर सूर्यकुमार यादवचं वक्तव्य

राजस्थानचा गोलंदाज युझवेंद्र चहल आणि मुंबई इंडियन्सचा फलंदाज सुर्यकुमार यादव यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती.

Updated: May 2, 2022, 09:55 AM IST
मला फार मजा आली... चहलसोबत झालेल्या त्या घटनेनंतर सूर्यकुमार यादवचं वक्तव्य title=

मुंबई : मुंबई इंडियन्सने यंदाच्या आयपीएलमध्ये पहिला विजय नोंदवला आहे. या विजयाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. राजस्थान रॉयल्सचा 5 विकेट्सने पराभव करत मुंबई विजयपथावर आली आहे. दरम्यान या सामन्यात राजस्थानचा गोलंदाज युझवेंद्र चहल आणि मुंबई इंडियन्सचा फलंदाज सुर्यकुमार यादव यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यानंतर आता प्रथमच सुर्यकुमार यादवने प्रतिक्रिया दिली आहे. 

सुर्यकुमार यादव म्हणाला, मी सामन्यादरम्यान त्याला काहीही बोललो नाही. हे आमच्यातील फक्त एक छोटं भांडण होतं ज्याचा आम्ही आनंद घेतला. मला खूप आनंद झाला की, अंपायरच्या निर्णायमुळे मला जीवनदान मिळालं आणि त्यानंतर सर्व गोष्टी आमच्या बाजूने घडल्या. 

युझवेंद्र चहल एक चांगला गोलंदाज आहे आणि त्याच्यासोबत मस्करीत भांडण करायचा मला फार मज्जा आली, असंही सुर्यकुमार यादवने सांगितलं आहे.

सामन्याच्या 8व्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. ज्यामध्ये राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला त्याच्या फिरकीत जवळपास अडकवलं होतं. चहलचा बॉल यादवच्या पॅडवर लागला होता. या घटनेनंतर चहलने अपील केलं. अंपयारने नॉटआऊट दिल्यानंतर चहलने विलंब न लावता डीआरएस घेतला.

यानंतर थर्ड अंपायरच्या निर्णयाने युझवेंद्र चहल निराश झाला कारण  त्यांचा निर्णय फलंदाजाच्या बाजूने गेला. त्याचवेळी थर्ड अंपायरच्या या निर्णयावर चहल चांगलाच संतापला होता. तर, त्याला नाबाद फलंदाज सूर्यकुमार यादवने मिठी मारली. यानंतर चहल लगेच शांतंही झाला.