India tour of Bangladesh : टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ची लवकरच टेस्ट टीममध्ये एन्ट्री होण्याची चिन्ह आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बांगलादेशविरूद्ध (Bangladesh Test) होणाऱ्या टेस्ट सीरीजमध्ये मिस्टर 360 डिग्रीला खेळण्याची संधी मिळू शकते. बीसीसीआयशी (BCCI) संबंधीत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) जागी टीममध्ये सूर्याची एन्ट्री होऊ शकते. जडेजा अजूनही दुखापतीतून सावरला नाहीये. त्यामुळे कदाचित तो बांगलादेशाच्या सिरीजविरूद्ध उपलब्ध राहणार नाहीये.
अनुभवी ऑलराऊंडर रवींद्र जडेजा 14 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या बांगलादेशविरूद्धच्या टेस्ट सिरीजपूर्वी पूर्णपणे फीट होण्याची शक्यता कमी आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, स्पिनर म्हणून भारताकडे 3 पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल तसंच कुलदीप यादव हे आहेत. अशात उत्तम फॉर्ममध्ये असलेल्या सूर्यकुमार यादवचा क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉर्मेटमध्ये सहभाग केला जाऊ शकतो.
आतापर्यंत सूर्यकुमारने टी-20 आणि वनडे क्रिकेटमध्ये चांगला खेळ दाखवला आहे. मात्र अजून त्याला टेस्ट क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याला टेस्ट फॉर्मेट खेळण्याची संधी मिळणार का हा प्रश्न चाहत्यांना आहे. दरम्यान यावर आता सूर्यकुमारने स्वतः विधान केलं आहे.
न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यानंतर प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये सूर्यकुमार यादव म्हणाला, जेव्हा मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा केवळ लाल बॉलचा खेळ होता आणि मुंबईकडून मी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलो आहे. त्यामुळे मी टेस्ट फॉर्मेट चांगल्या पद्धतीने जाणतो. मला आशा आहे की, मला लवकरच टेस्ट कॅप मिळणार आहे.
सूर्यकुमारचा फर्स्ट क्लासचा रेकॉर्डही फार चांगला आहे. सूर्यकुमारने मुंबईसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटच्या सामन्यांमध्ये 44.01 च्या सरासरीने 5326 रन्स केले आहेत.