IND vs NZ: पहिल्या वनडे सामन्यात Sanju Samson ला मिळणार संधी? कसं असेल Playing 11

शिखर धवन अनेक खेळाडूंना संधी देण्याची शक्यता आहे. बघूया वनडे सामन्यासाठी टीम इंडियाचं प्लेइंग 11 (Team India Playing 11) कसं असणार आहे.

Updated: Nov 23, 2022, 03:51 PM IST
IND vs NZ: पहिल्या वनडे सामन्यात Sanju Samson ला मिळणार संधी? कसं असेल Playing 11 title=

India vs New Zealand, 1st ODI: टी-20 सिरीज जिंकल्यानंतर आता टीम इंडियाची वनडे सिरीजवर (India vs New Zealand ODI) नजर आहे. 25 नोव्हेंबर म्हणजेच शुक्रवारी पहिली वनडे खेळवली जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजता हा सामना सुरु होणार आहे. शिखर धवन (Shikhar Dhawan) या टीमचं नेतृत्व करणार आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या (IND vs NZ) वनडे सामन्याची टीम टी-20 पेक्षा वेगळी असणार आहे. यामध्ये शिखर धवन अनेक खेळाडूंना संधी देण्याची शक्यता आहे. बघूया वनडे सामन्यासाठी टीम इंडियाचं प्लेइंग 11 (Team India Playing 11) कसं असणार आहे.

अशी असेल ओपनिंग जोडी

कर्णधार शिखर धवन आणि शुभमन गिल न्यूझीलंड विरूद्धच्या वनडे सामन्यांमध्ये ओपनिंगला उतरणार असण्याची दाट शक्यता आहे. शिखर आणि शुभमन दोघेदी विस्फोटक फलंदाज असून ते सामन्याचं चित्र पालटू शकतात. शिखरकडे वनडे सामन्याचा चांगला अनुभव आहे. त्याच्या नावे 17 वनडे शतकांची नोंद आहे.

कशी असेल मिडल ऑर्डर

न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात नंबर 3 वर सूर्यकुमार यादव फलंदाजीसाठी उतरणार आहे. तर नंबर 4 वर श्रेयस अय्यरला संधी मिळू शकते. यानंतर 5 व्या क्रमांकासाठी संजू सॅमसनच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. यानंतर 6व्या नंबरवर ऋषभ पंत उतरेल.

धवन या गोलंदाजांवर दाखवणार विश्वास

पहिल्या वनडेमध्ये चायनामॅन गोलंदाज म्हणजे कुलदीप यादवच्या नावाचा समावेश केला जाऊ शकतो. कुलदीप केवळ एकच स्पेशलिस्ट स्पिनर गोलंदाज आहे. याशिवाय शार्दुल ठाकुर, अर्शदीप सिंह आणि दीपक चाहर यांच्यावर गोलंदाजीची जबाबदारी देण्यात येईल.

पहिल्या वनडेसाठी टीम इंडियाची Playing 11

शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सैमसन, ऋषभ पंत (विकेटकीपर), शहबाज अहमद, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, अर्शदीप सिंह, दीपक चाहर.