बाबर आझमचं T20 तलं अव्वल स्थान धोक्यात, Team India च्या स्टार खेळाडूची नजर

रोहित, विराट नव्हे तर टीम इंडियाचा स्टार फलंदाज बाबर आझमला टाकणार मागे

Updated: Aug 6, 2022, 12:13 PM IST
बाबर आझमचं T20 तलं अव्वल स्थान धोक्यात, Team India च्या स्टार खेळाडूची नजर  title=

मुंबई : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) सध्या चांगलाच फॉर्ममध्ये आहे. अनेक सामन्यात त्याने उत्कृष्ट कामगिरी केल्याने त्याची आंतरराष्ट्रीय टी20 रॅकींगच्या अव्वल स्थानी वर्णी लागली होती. गेल्या अनेक महिन्यापासून तो हे स्थान बळकावून आहे. मात्र आता हे त्याचे स्थान धोक्यात आले आहे. कारण टीम इंडियाचा स्टार फलंदाजाची या त्याच्या स्थानावर करडी नजर आहे. 

वेस्ट इंडिज आणि इंग्लंडच्या झंझावाती कामगिरीचा टीम इंडियाचा फलंदाज सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) फायदा झाला आहे. आयसीसी टी-20 क्रमवारीत त्याने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.  टॉप-10 मध्ये तो एकमेव भारतीय फलंदाज आहे. सूर्यकुमार यादवला  (Suryakumar Yadav)  T20 मध्ये भारताचा सर्वोत्तम फलंदाज होण्यासाठी 506 दिवस लागले. त्याने केवळ 22 सामन्यांमध्ये 38.11 च्या सरासरीने आणि 175.60 च्या स्ट्राइक रेटने 648 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये सूर्यकुमार यादवने एक शतक आणि पाच अर्धशतके झळकावली आहेत.

सूर्यकुमार यादव  (Suryakumar Yadav) गेल्या अनेक महिन्यापासून फॉर्ममध्ये आहे. अनेक सामन्यांमध्ये त्याने उत्कृष्ट फलंदाजी करून टीम इंडियाला जिंकवले आहे. त्याच्या या कामगिरीचे फळ त्याला मिळाले आहे. कारण अलीकडेच तो ICC T20 क्रमवारीत नंबर 2 चा खेळाडू बनला आहे. आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या दोन टी-20 सामन्यांमध्ये तो पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकून टी20त नंबर एकचा फलंदाज बनू शकतो. यासाठी त्याला विंडीजविरुद्ध सामन्यात चांगली कामगिरी करावी लागणार आहे.  

टी-20 क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांत बाबर आझमने केलेल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर क्रमवारीत अव्वल स्थान गाठलेय. बाबर आझम 818 गुणांसह T20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. सूर्यकुमार यादवला 816 गुण आहेत. इनसाइड स्पोर्ट्सच्या रिपोर्टनुसार, जर सूर्यकुमार यादवने वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात 50 धावा केल्या तर तो टी-20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचेल. अशा स्थितीत तो बाबर आझमला क्रमवारीत मागे टाकेल.  

दरम्यान आता सुर्यकुमार यादव बाबर आझमचं क्रमवारीतलं अव्वल काबीज करतो, हे आगामी सामन्यातच कळणार आहे.