स्टिफन्सला अमेरिकन ओपनच्या महिला एकेरीचं जेतेपद

अमेरिकेच्या बिगर मानांकित स्लोआन स्टिफन्सनं आपल्या देशाच्या मॅडिसन कीज् हिचा धुव्वा उडवत अमेरिकन ओपनच्या महिला एकेरीचं जेतेपद पटकावलं आहे.

Updated: Sep 10, 2017, 12:04 PM IST
स्टिफन्सला अमेरिकन ओपनच्या महिला एकेरीचं जेतेपद title=

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या बिगर मानांकित स्लोआन स्टिफन्सनं आपल्या देशाच्या मॅडिसन कीज् हिचा धुव्वा उडवत अमेरिकन ओपनच्या महिला एकेरीचं जेतेपद पटकावलं आहे.

एकतर्फी झालेल्या लढतीत अवघ्या तासाभरतच स्लोआन स्टीफन्सनं 6-3, 6-0 अशा सेटमध्ये मॅडिसन कीज् हिचा पराभव केला आहे. स्लोआनचं हे पहिलंच ग्रँडस्लॅम अजिंक्यपद असून ती अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या इतिहासातील दुसरी बिगर मानांकित विजेती ठरली आहे.