ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिरीजसाठी होणार टीम इंडियाची घोषणा

येत्या १७ सप्टेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पाच सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिल्या तीन वनडेसाठी टीम इंडियाची निवड करण्यात येणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही निवड करण्यात येणार आहे. २०१९ क्रिकेट वर्ल्डकप तयारीच्या पार्श्वभूमीवर या टीममध्ये कुणाला संधी मिळणार याकडं क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत. 

Updated: Sep 10, 2017, 11:18 AM IST
ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिरीजसाठी होणार टीम इंडियाची घोषणा title=

मुंबई : येत्या १७ सप्टेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पाच सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिल्या तीन वनडेसाठी टीम इंडियाची निवड करण्यात येणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही निवड करण्यात येणार आहे. २०१९ क्रिकेट वर्ल्डकप तयारीच्या पार्श्वभूमीवर या टीममध्ये कुणाला संधी मिळणार याकडं क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत. 

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत विश्रांती देण्यात आलेल्या आर. अश्विनचं टीममध्ये कमबॅक होणार का याविषयी चर्चा सुरु आहेत. अश्विन सध्या वुस्टरशायरकडून इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळतो आहे. अश्विनचा त्यांच्याशी चार मॅचचा करार झाला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या तीन वनडेसाठी त्याची निवड होणार का याकडं लक्ष लागलं आहे. तर आगामी मालिकेत भुवनेश्वर कुमारला विश्रांती देऊन त्याच्या जागी शमी किंवा उमेश यादवचं कमबॅक होण्याची शक्यता आहे.