BCCI मालामाल, स्टार इंडियाने विक्रमी बोली लावत मिळवले क्रिकेट प्रसारण हक्क

भारतीय क्रिकेट सामन्यांच्या हक्कासाठी विक्रमी बोली लागली. स्टार इंडियाच्या बोलीमुळे BCCI मालामाल झाली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 6, 2018, 12:19 PM IST
BCCI मालामाल, स्टार इंडियाने विक्रमी बोली लावत मिळवले क्रिकेट प्रसारण हक्क  title=

मुंबई : भारतीय क्रिकेट सामन्यांच्या हक्कासाठी विक्रमी बोली लागलू. स्टार इंडियाने क्रिकेटसाठी तब्बल ६१३८ कोटींची बोली लावून प्रसारण हक्क विकत घेतले.त्यामुळे BCCI मालामाल झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) पहिलावहिला ई-लिलाव मंगळवारी सुरु केला. पहिल्या दिवशी विक्रमी बोली लागली होती. पहिल्या दिवशी ४४४२ कोटींची बोली लागली.  त्यामुळे दुसऱ्या दिवशी ही बोली वाढणार का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. दुसऱ्या दिवशी ६०३२.५ कोटींची  बोली लागली. तीन दिवस चाललेल्या या लिलाव प्रक्रियेत स्टार, सोनी, जिओ, फेसबूक, गूगल या मातब्बर कंपन्यांनी सहभाग घेतलाय. त्यामुळे क्रिकेट प्रसारणचे हक्क मिळविण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरु होता.

देशांतर्गत आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकांसाठी  बीसीसीआयने पहिलावहिला ई-लिलाव सुरु केला. प्रसारण हक्कासाठी सहा कंपन्या उत्सुक आहेत. यात स्टार, सोनी, जिओ याचप्रमाणे ऑनलाइन क्षेत्रातील मातब्बर असे फेसबूक आणि गूगल यांचासुद्धा समावेश आहे. २०१२ रोजी स्टार टीव्हीने ३८५१ कोटींची बोली लावली होती. यात आता १५ टक्के वाढ झालेय. पुढील पाच वर्षांसाठी ही लिलाव प्रक्रिया सुरु झालेय. १०२ सामन्यांसाठी हा लिलाव झालाय.

पहिली सर्वात मोठी बोली ४१७६ कोटींची होती. त्यानंतर त्यात २५-२५ कोटींची भर पडली. काही लिलाव बोली ४२०१.२० कोटी, ४२४४ कोटी, ४३०३ कोटी आणि ४३२८.२५ कोटी रुपयांदरम्यान होती. स्टार इंडियाने सर्वाधिक बोली लावून क्रिकेट प्रसारणाचे हक्क मिळविले आहे. ही रक्कम मागील पाच वर्षांच्या कराराच्या तुलनेत ५९ टक्के जास्त आहे. आता स्टार वाहिनीला एका सामन्यासाठी ६० कोटी, तर वर्षासाठी १२२७ कोटी मोजावे लागणार आहेत. स्टार इंडियाने याआधी २०१२ ते २०१८ या कालावधीत झालेल्या क्रिकेट मालिकांसाठी ३८५१ कोटी मोजले होते.  आता  २०१८-२०२२ या वर्षांसाठी आयपीएल लढतींच्या मीडिया प्रक्षेपणाचे हक्क १६३४७.५ कोटींना खरेदी केले होते.