गंभीरने केल्या दोन मोठ्या घोषणा, पहिली आयपीएल आणि दुसरी...

टीम इंडियाचा फलंदाज गौतम गंभीरने आता आयपीएलबाबत मोठी घोषणा केलीये. इंडियन प्रीमियर लीगचा संघ दिल्ली डेअरडेविल्सचा कर्णधार गौतम गंभीर म्हणाला, आयपीएलचा ११वा हंगाम त्याच्यासाठी अखेरचा असेल. गंभीर आयपीएलच्या सुरुवातीच्या तीन सत्रात दिल्लीचा कर्णधार होता. यानंतर तो कोलकाता टीममध्ये होता. 

Updated: Apr 6, 2018, 10:33 AM IST
गंभीरने केल्या दोन मोठ्या घोषणा, पहिली आयपीएल आणि दुसरी... title=

मुंबई : टीम इंडियाचा फलंदाज गौतम गंभीरने आता आयपीएलबाबत मोठी घोषणा केलीये. इंडियन प्रीमियर लीगचा संघ दिल्ली डेअरडेविल्सचा कर्णधार गौतम गंभीर म्हणाला, आयपीएलचा ११वा हंगाम त्याच्यासाठी अखेरचा असेल. गंभीर आयपीएलच्या सुरुवातीच्या तीन सत्रात दिल्लीचा कर्णधार होता. यानंतर तो कोलकाता टीममध्ये होता. 

गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाताने दोन वेळा जेतेपद उंचावले. मात्र आता त्याच्याकडे पुन्हा दिल्लीचे कर्णधारपद आलेयय. त्यामुळे दिल्लीला आयपीएलचे जेतेपद जिंकून देण्याचा गंभीरचा प्रयत्न असेल. आपल्या घरच्या संघाला जेतेपद जिंकून देत अलविदा करण्याचा त्याचा प्रयत्न असेल.

गंभीरने गुरुवारी वार्ताहरांशी संवाद साधला. यावेळी तो म्हणाला, मी जेथून आयपीएलला सुरुवात केली तिथेच शेवट करेन मात्र विजयासोबत. दिल्लीच्या संघात यावेळी चांगले खेळाडू आहेत. संघासोबत यावेळी दोन वेळा वर्ल्डकप जिंकवणारा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आहे. त्याचा टीमला मोठा फायदा होईल. कोणताही संघ जेव्हा जेतेपद जिंकतो तेव्हा संघातील सगळ्यांचे सामूहिक योगदान असते. संघाला चॅम्पियन बनवण्यात कर्णधाराची कमी मात्र इतर खेळाडूंची भूमिका अधिक असते. दिल्लीमध्येही कोलकाताप्रमाणे चांगले खेळाडू आहेत. मात्र त्यांची कामगिरी चांगली झाली पाहिजे.