नवी दिल्ली : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टी-२० मॅचमध्ये श्रीलंकेने टीम इंडियासमोर विजयासाठी १७१ रन्सचं आव्हान दिलं आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात होत असलेल्या एकमेव टी-२० मॅचमध्ये श्रीलंकेने प्रथम बॅटींग करत २० ओव्हर्समध्ये १७० रन्सपर्यंत मजल मारली. त्यामुळे आता टीम इंडियाला विजयासाठी १७१ रन्सची आवश्यकता आहे.
कोलंबोतील प्रेमदासा स्टेडीयमवर सुरु असलेल्या मॅचमध्ये टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम फिल्डींग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात आलेल्या श्रीलंकेच्या टीमने १७० रन्स केले. श्रीलंकेच्या टीमकडून मुनवीराने २९ बॉल्समध्ये ५३ रन्स केले. ज्यामध्ये ५ फोर आणि ४ सिक्सरचा समावेश आहे. तर, प्रियंजनने ४० बॉल्समध्ये ४० रन्स करत नॉट आऊट राहीला.
भारताकडून सर्वाधिक विकेट्स चहलने घेतले. चहलने ४ ओव्हर्समध्ये ४३ रन्स देत ३ विकेट्स घेतले. कुलदीप यादवने ४ ओव्हर्समध्ये २० रन्स देत २ विकेट्स घेतले. तर, बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतला.