Asia Cup विजेत्या श्रीलंका आणि उपविजेत्या पाकिस्तानला किती बक्षीस रक्कम मिळाली? जाणून घ्या

सहाव्यांदा Asia Cup वर नाव कोरणाऱ्या श्रीलंकेला मिळाले इतके कोटी, तर पाकिस्तानच्या खात्यात इतकी रक्कम जमा 

Updated: Sep 12, 2022, 01:56 PM IST
 Asia Cup विजेत्या श्रीलंका आणि उपविजेत्या पाकिस्तानला किती बक्षीस रक्कम मिळाली? जाणून घ्या title=

दुबई : आशिया कप 2022 (Asia cup 2022) वर रविवारी श्रीलंकेने नाव कोरले. बलाढ्य पाकिस्तानचा पराभव करत श्रीलंकेने (SL vs PAK) सहाव्यांदा आशिया कपवर नाव कोरले. तर पाकिस्तान संघ उपविजेता ठरला. या विजेतेपदानंतर या संघाना आता बक्षीस रक्कम किती मिळणार असा प्रश्न समोर येतोय. त्यामुळे जाणून घेऊयात या संघांना किती बक्षीस रक्कम मिळाली. 
 
आशिया कपच्या (Asia cup 2022) फायनल सामन्यात श्रीलंकेने प्रथम बॅटींग करून 170 धावा ठोकल्या आहेत. श्रीलंकेकडून भानुका राजपक्षेने (bhanuka rajapaksa) 45 चेंडूत 71 धावांची नाबाद खेळी केली होती. श्रीलंकेने पाकिस्तानला (SL vs PAK)  177 धावांचे आव्हान दिले होते. श्रीलंकेच्या 170 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाचा डाव 147 धावांवर गुंडाळला. यामुळे 23 धावांनी श्रीलंकेने पाकिस्तानवर विजय मिळवला आहे. 

या विजयासह आशिया कपवर (Asia cup 2022) श्रीलंकेने नाव कोरले. श्रीलंकेने या विजयासह सहाव्यांदा आशिया कप उंचावला. तर पाकिस्तान संघ तिसऱ्यांदा आशिया कपवर नाव कोरण्यापासून हुकला आहे. पाकिस्तानसाठी हा मोठा पराभव होता. 

 

श्रीलंकेची बक्षीस रक्कम किती? 
श्रीलंकेने (Sri Lanka) आशिया कपवर (Asia cup 2022) नाव कोरल्यानंतर त्यांना 1.5 लाख डॉलरचा चेक देण्यात आला. भारतीय चलनानुसार त्यांना 1.2 कोटी बक्षीस रक्कम मिळाली.  या स्पर्धेसाठी वानिंदू हसरंगाला 'प्लेअर ऑफ द सिरीज' म्हणून गौरविण्यात आले. त्याला 15 हजार डॉलरचा चेक देण्यात आला. भारतीय चलनानुसार हे सुमारे 12 लाख रुपये झाले. भानुका राजपक्षेला अंतिम सामन्यासाठी 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून गौरविण्यात आले. राजपक्षे यांना ५ हजार डॉलर्सचा चेक देण्यात आला. तर सामन्यातील सर्वोत्तम झेलसाठी 3 हजार डॉलर्सचा चेक देण्यात आला.

पाकिस्तानची बक्षीस रक्कम? 
 आशिया चषक स्पर्धेत उपविजेत्या ठरलेल्या पाकिस्तान (Pakistan)  संघाला  75 हजार डॉलर (सुमारे 60 लाख रुपये) बक्षीस रक्कम मिळाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार ही माहिती मिळाली आहे.