संजू सॅमसननं सांगितलं विजयाचं रहस्य, राजस्थानच्या नावे IPL मध्ये अनोखा रेकॉर्ड

राजस्थानला विजय मिळवण्यामागे या व्यक्तीचा सिंहाचा वाटा, कर्णधार संजू सॅमसननं सांगितलं यशाचं गुपित

Updated: Mar 30, 2022, 03:15 PM IST
संजू सॅमसननं सांगितलं विजयाचं रहस्य, राजस्थानच्या नावे IPL मध्ये अनोखा रेकॉर्ड title=

मुंबई : हैदराबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात संजू सॅमसनची टीम राजस्थानने विजय मिळवला आहे. पुण्यात झालेल्या या सामन्यात राजस्थान टीमने 61 धावांनी विजय मिळवला. केन विल्यमसननं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. राजस्थान संघाने 200 हून अधिक धावा केल्या. 

लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबाद संघ पावरप्लेमध्येच कमी पडला. त्यामुळे टीमचं मनोबल ढासळलं आणि परिणामी हैदराबाद टीमला पराभव स्वीकारावा लागला. राजस्थान टीमच्या विजयाचं श्रेय संजू सॅमसननं एका खास व्यक्तीला दिलं आहे. 

संजू सॅमसननं टीमच्या विजयाचं श्रेय टीमच्या कोचला दिलं आहे. या विजयामध्ये माझा वाटा आहे याचा खूप आनंद आहे. मी माझ्या फिटनेसवर काम केलं. पिचवर सेट होण्यासाठी थोडा वेळही घेतला. यामध्ये संगकारा सारख्या लीडरची आम्हाला खूप जास्त मदत झाली. 

यंदाच्या सीझनमध्ये खूप स्वप्न घेऊन टीम मैदानात उतरली आहे. सुरुवात चांगली झाली. पुन्हा एकदा आम्ही आमच्यातल्या मजबूत बाजू पाहून पुढच्या सामन्यावर लक्ष केंद्रीत करणार आहोत. 

राजस्थान टीमने 15 व्या हंगामात एक अनोखा रेकॉर्ड बनवला. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात पहिली बॅटिंग करणारी टीम जिंकली आहे. आतापर्यंत दुसऱ्यांदा बॅटिंग करणाऱ्या टीमचा विजय झाल्याचा रेकॉर्ड होता. मात्र तो राजस्थाननं मोडत विक्रम रचला. 

राजस्थान टीमने 210 धावा केल्या आहेत. संजू सॅमसननं अर्धशतकी खेळी केली. राजस्थान टीमने पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी मारत पहिलं स्थान मिळवलं आहे.