Ravindra Jadeja:रवींद्र जडेजाचा भीमपराक्रम! वर्ल्ड कप विजेत्या दिग्गज खेळाडूचा रेकॉर्ड ब्रेक

Sir Ravindra Jadeja 7-wicket: दुसऱ्या कसोटी सामन्यात रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) उत्कृष्ट गोलंदाजी करून दाखवली आहे. दिल्लीत रंगलेल्या या कसोटीत जडेजाची फिरकीची जादू पून्हा एकदा चालली आहे. जडेजाच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाने पुर्णत नांगी टाकली होती. एकटा जडेजा ऑस्ट्रेलियाला पुरून उरला आहे.

Updated: Feb 19, 2023, 04:46 PM IST
 Ravindra Jadeja:रवींद्र जडेजाचा भीमपराक्रम! वर्ल्ड कप विजेत्या दिग्गज खेळाडूचा रेकॉर्ड ब्रेक  title=

Sir Ravindra Jadeja 7-wicket: दिल्ली कसोटी सामन्यात टीम इंडियाचा स्पिनर रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) गोलंदाजीची जादू पुन्हा एकदा चालली आहे.जडेजाने एकट्याने ऑस्ट्रेलियाच्या अर्ध्या संघाला पव्हेलियन धाडले आहे.ऑस्ट्रेलियाच्या (australia)दुसऱ्या डावात जडेजाने एकट्याने 7 विकेट घेतल्या आहेत. ही कामगिरी करून त्याने दिग्गज खेळाडूचा रेकॉर्ड मोडलाय.हा नेमका रेकॉर्ड काय होता, हे जाणून घेऊयात. 

सर जड्डूच्या फिरकीची कमाल  

दुसऱ्या कसोटी सामन्यात रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) उत्कृष्ट गोलंदाजी करून दाखवली आहे. दिल्लीत रंगलेल्या या कसोटीत जडेजाची फिरकीची जादू पून्हा एकदा चालली आहे. जडेजाच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाने पुर्णत नांगी टाकली होती. एकटा जडेजा ऑस्ट्रेलियाला पुरून उरला आहे. जडेजाने आपल्या गोलंदाजीचे कौशल्य दाखवले असून तो 7 विकेट घेण्यास यशस्वी ठरला आहे. हे 7 विकेट घेऊन त्याने वर्ल्ड कप विजेत दिग्गज खेळाडू कपिल देव यांचा रेकॉर्ड मोडलाय. 

 

हे ही वाचा : रविचंद्रन अश्विनने रचला इतिहास! गेल्या 23 वर्षात असा रेकॉर्ड कोणालाच जमला नाही

 

जडेजाने (Ravindra Jadeja) 12.1 षटकात 42 धावा देत 7 विकेट घेतल्या. त्याच्या गोलंदाजी दरम्यान सर रवींद्र जडेजाने 6 फलंदाजांना गोलंदाजी करत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. 7 विकेट्समध्ये 6 बॅट्समन बोल्ड झाले आणि 1 बॅट्समन झेलबाद झाला आहे.त्याच्या या कामगिरीची चर्चा आहे. 

रेकॉर्ड ब्रेक

दिल्ली कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात जडेजाने(Ravindra Jadeja)  7 विकेट घेत माजी महान दिग्गज कपिल देव यांचा विक्रम मोडला आहे. कपिल देव (Kapil Dev) यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 20 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 79 विकेट घेतल्या.आता जडेजाच्या नावावर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 80 विकेट्स झाल्या आहेत. यासह रवींद्र जडेजा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

पहिल्या क्रमांकारवर कोण? 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सर्वाधिक विकेट घेण्याच्या यादीत अनिल कुंबळे (Anil Kumble) पहिल्या क्रमांकावर आहे.  अनिल कुंबळेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत 111 विकेट्स घेतल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर अश्विन आहे ज्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत 103 बळी घेतले आहेत. तसेच लियानने भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 101 बळी घेतले आहेत. हरभजन सिंहने 95 विकेट घेतल्या आहेत.

दरम्यान दिल्ली कसोटीच्या तिसऱ्या दिवशी अश्विन (R Ashwin)आणि जडेजा (Ravindra Jadeja) या भारतीय फिरकी गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 113 धावांत गुंडाळले. जडेजाने 7 तर अश्विनने 3 बळी घेतले. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 115 धावांचे लक्ष्य दिले होते. टीम इंडियाने 6 विकेट राखून हे लक्ष्य सहज पुर्ण केले.या विजयासह टीम इंडियाने 2-0ने मालिकेत आघाडी घेतली आहे.